शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

होय! मी रा. स्व. संघाचा, आधी अंबुज, नंतर मंत्री...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.

ठळक मुद्देदिलीप कांबळे : एससीच्या आरक्षणाचीही होऊ शकते अ, ब, क, ड वर्गवारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘होय! मी कुणाला घाबरत नाही. मी राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा कट्टर आहे. मी रा. स्व. संघातूनच घडलो आहे आणि मी मंत्री असेन. पण त्याआधी अंबुज आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी ठणकावून सांगू इच्छतो की, अंबुजांचं भलं सध्याचं सरकारच करू शकतं. कारण तशी पावलं या सरकारनं उचलली आहेत’ असा स्पष्ट निर्वाळा आज येथे राज्याचे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिला.ते संत एकनाथ रंगमंदिरात मातंग समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवीत घणाघाती टीका केली व सल्ला दिला की, आता मातंग समाजाच्या तरुणांनी उद्योगधंद्यांकडे वळले पाहिजे. त्यासाठी सरकार योजना आखत असल्याचे नमूद केले.यावेळी आ. अतुल सावे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, सामाजिक समरसता मंचचे निमंत्रक रमेश पांडव यांची भाषणे झाली. प्रा. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका ज्योती नाडे, डॉ. शेषराव नाडे, जालिंदर शेंडगे, नगरसेविका कीर्ती शिंदे आदींची मंचावर उपस्थिती होती. राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी ठरावांचे वाचन केले. बागडे यांच्या हस्ते क्रांतिगुरू लहुजी साळवे समाज गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. डॉ. संजय सांभाळकर, किशनचंद तनवाणी, महेंद्र सोनवणे, मनीषा भन्साळी, अविनाश साळवे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, जगदीश वाघमारे, तुकाराम सोळसे यांना प्रदान केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बबनराव दाभाडे, राजीव खाजेकर, मच्छिंद्र कांबळे, राजूअण्णा खाजेकर, शांताबाई दणके, छाया खाजेकर, राजश्री साठे, सुनीता भालेराव, सुरेखा दणके, काकासाहेब नाडे आदींनी परिश्रम घेतले.