शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पिवळ्या पाण्याची शिक्षा !

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

कळंब : शहराला मागील महिनाभरापासून न.प.द्वारे पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड झाल्याने धरणातील पाणी थेट नळाद्वारे जसेच्या तसे येत आहे. याकडे न.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शहरवासीय मात्र महिनाभरापासून पिवळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे.कळंब शहर व डिकसळ या गावातील जवळपास ४० हजार नागरिकांना कळंब पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो आहे. सध्या शहरातील विविध भागात न.प. तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करते. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना नळाद्वारे पिवळे पाणी मिळत आहे. शहरातील सर्वच भागात हीच परिस्थिती आढळून येत असल्याने शहरात हा चर्चेचा विषय झाला आहे. न.प. प्रशासन दरवर्षी पाण्याच्या शुद्धीकरणावर लाखो रुपये खर्च करते. तुरटी, पावडर आदी वस्तूंची नियमितपणे व प्राधान्याने खरेदी केली जाते. मागील सत्ताधारी मंडळींनी जाता-जाता लाखो रुपये खर्चून या जलशुद्धीकरण केंद्रातील गाळही काढला होता. प्रशासनाकडे पाणी शुद्धीकरण करण्याच्या वस्तूंची कमतरता नसतानाही शहरवासीयांच्या नशिबी पिवळे पाणी कशामुळे? असा संतप्त सवालही नागरिकांमधून विचारला जात आहे.न.प.ने नुकतीच ‘मार्च एण्ड’च्या नावाखाली जवळपास ८० टक्के पाणीपट्टी वसूल केली आहे. ज्यांनी पाणीपट्टी वा इतर कर भरला नाही अशा ‘टॉप टेन’ थकबाकीदारांचे डिजिटल बॅनर शहरात झळकावून त्यांचा उद्धार केला; मग पाणीपट्टी भरूनही अशुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या न.प. प्रशासनाचा कसा निषेध व्यक्त करावा, अशी प्रतिक्रियाही शहरवासीयांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत न.प. प्रशासन मात्र स्पष्टपणे काहीही सांगत नाही. धरणातून पाणी ढवळून येत असल्याने ते पूर्ण क्षमतेने शुद्ध होत नसल्याचे न.प.चे म्हणणे आहे; मात्र हा प्रकार महिनाभरापासून सुरू असताना यावर न.प. प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा आहे. मग गढूळ पाणी येण्याचा संबंध काय? पाणी ढवळून येत असेल व ते शुद्धच होत नसेल तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणाची वाट बघितली जात आहे, हा प्रश्नही आता सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागल्याने आगामी काळात पिवळे पाणी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे(वार्ताहर)