शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

येडेश्वरी देवीच्या यात्रा उत्सवाची सांगता

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त आमराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली देवीची पालखी रविवारी वाजत-गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात दाखल झाली

येरमाळा : येथील श्री येडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवानिमित्त आमराई मंदिरामध्ये पाच दिवसाच्या मुक्कामासाठी आलेली देवीची पालखी रविवारी वाजत-गाजत डोंगरावरील मुख्य मंदिरात दाखल झाली. यानंतर या यात्राउत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येरमाळासह परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेला ११ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी देवीची आमराई मंदिरामध्ये पाच दिवसांच्या मुक्कामासाठी दाखल झाली होती. रविवारी दुपारी या पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी मंदिरामध्ये विधीवत पूजा-अर्चा क़रून घुगरी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. चुन्याच्या रानात पालखीचे आगमन झाल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. येथून पुढे पालखी सोहळा गावातील मुख्य रस्त्यावरून मंदिराकडे निघाला. यादरम्यान महिलांनी पालखी मार्गावर स्वागतासाठी सडा टाकून रांगोळी काढल्या होत्या. चौका-चौकात पालखीचे दर्शन घेऊन लोक पालखीच्या खांदेकऱ्यांच्या पायावर घागरीने पाणी ओतून लाह्या, बत्तासे व फुटाण्याचा प्रसाद एकमेंकांना वाटत होते. या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कुस्ती स्पर्धा, पशुप्रदर्शन, आराध्यांच्या गाण्याचा मेळा, शोभेच्या दारूची आतषबाजी आदी कार्यक्रम पार पडले. पालखीला निरोप देण्यासाठी मानकरी आमोल पाटील, रामराव पाटील, अंकुश पाटील, सुभाष पाटील, सुनील पाटील, यशवंत पाटील, सरपंच विकास बारकूल, मदन बारकूल, संजय बारकूल, संजय निचळे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)