कळमनुरी : येथील न.प.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या यासमीन बेगम फारुक बागवान तर उपनगराध्यक्षपदी राकाँचे म. नाजीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांचे चार अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेसच्या मुख्तारबी हमीदुल्ला पठाण, सेनेच्या गिरजाबाई बाबाराव खोडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या यासमीन बेगम या एकमेव उमेदवार रिंगणात राहिल्या. संध्याकाळी ४.३० वाजता नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १७ न. प. सदस्यांपैकी १६ नगरसेवक हजर होते. तर सेनेच्या गिरजाबाई खोडके या अनुपस्थित होत्या. यासमीनबेगम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची नगराध्यक्षपदी पीठासन अधिकारी एम. बी. निलावाड यांनी बिनविरोध निवड घोषित केली. त्यानंतर लागलीच उपनगराध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उपनगराध्यक्षपदासाठी राकाँचे म. नाजीम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची पीठासन अधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्षपदी निवड घोषित केली. यावेळी तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, के.एम. विरकुंवर, माजी नगराध्यक्ष सादिया तबस्सूम, म. रफीक, उल्हास राठोड, डी. एन. बोलके, म. जाकेर, वाघ नदीम, एस. टी. काळे, सचिन वाघमारे, गजानन इंगळे व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पोनि रविकांत सोनवणे, फौजदार सय्यद मनिषा तायडे, स. अथर, राम वंजे, एन. एस. दीपके, एम. एच. पठाण, गजानन राठोड, असोले आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यानंतर नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
कळमनुरीच्या नगराध्यक्षपदी यासमीन बेगम
By admin | Updated: July 16, 2014 00:50 IST