लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस होत असला तरी जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असलेल्या येलदरी, मासोळी, करपरा, मुळी या प्रकल्पात २५ टक्केही पाणीसाठा झाला नसल्याने पाणी टंचाईचे संकट कायम आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पावर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविली जाते. परभणी, जिंतूरसह पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातही या प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही या प्रकल्पात पाणीसाठा झालेला नाही. या प्रकल्पात सध्या ३४.१६ दलघमी उपयुक्त पाणी जमा झाले आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात ५.६ दलघमी, गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात २.८ दलघमी, मुळी बंधारा ०.५ दलघमी एवढाच पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असणाºया पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत.सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात ९९.६६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. हा एकमेव प्रकल्प पाण्याने भरला आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील झरी तलावात १.८२५ दलघमी, पाथरी तालुक्यातील ढालेगाव प्रकल्पात १३.५० दलघमी, मुदगल बंधाºयात १०.९९ दलघमी, डिग्रस बंधाºयात२७.८७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.
येलदरी, मासोळी प्रकल्प जोत्याखालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:13 IST