औरंगाबाद : उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती देण्याची सुविधा शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली असली तरी गेल्या वर्षी औरंगाबाद विभागातील १ हजार १६५ (१.०५ टक्के) विद्यार्थ्यांनी झेरॉक्स प्रतीची मागणी केली. त्यापैकी केवळ १२९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. प्राप्त अर्जांपैकी तब्बल ७०.५४ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला आहे. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासह विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची खातरजमा करण्याची सुविधा उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती उपलब्ध करून दिल्यामुळे होते. परंतु एका विषयाच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी ४०० रुपये शुल्क मोजावे लागते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेत नाहीत, असे दिसते. गेल्या वर्षी राज्यभरातून १२ लाख ७६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी फक्त १८ हजार ६७ (१.४१ टक्के) विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सची मागणी केली आणि केवळ १ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून घेतले. औरंगाबाद विभागातून फक्त १ हजार १६५ विद्यार्थ्यांनी झेरॉक्सची मागणी केली. पुणे विभागातून सर्वाधिक ४ हजार ६७२ (२.२३ टक्के) विद्यार्थ्यांनी मागणी केली. कोल्हापूर व कोकण विभागातील प्रत्येकी ०.७८ टक्के विद्यार्थ्यांनीच या सुविधेचा लाभ घेतला. तर सर्वात कमी लाभ ०.६४ टक्के नाशिकच्या विद्यार्थ्यांनी घेतला. पुनर्मूल्यांकनात गुणात बदलाचे प्रमाण ५८.५६ टक्के उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रती घेणार्या विद्यार्थ्यांनाच उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाची सुविधा वापरता येते. राज्यातील १८,०६७ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्सची मागणी केली व त्यापैकी १,५८८ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. पुनर्मूल्यांकनानंतर त्यातील ९३० (५८.५६ टक्के) विद्यार्थ्यांच्या गुणात बदल झाला. विभागनिहाय झेरॉक्स प्रतीची झालेली मागणी विभाग मंडळ विद्यार्थी टक्केवारी पुणे ४६७२२.२३ नागपूर १८१३१.११ औरंगाबाद ११६५ १.०५ मुंबई ६३७५ २.०० कोल्हापूर९०८०.७८ अमरावती ११६३१.०५ नाशिक ९४९ ०.६४ लातूर७८६ १.१५ कोकण २३६०.७८ १८,०६७ १.४१
केवळ एक टक्का विद्यार्थ्यांनी घेतल्या झेरॉक्स
By admin | Updated: June 4, 2014 01:34 IST