शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

पंचांगाचा चुकला अंदाज

By admin | Updated: August 27, 2014 00:43 IST

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़

उदगीर : पावसाअभावी उदगीर तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात सापडलेला आहे़ पेरणीनंतर हुलकावणी दिलेल्या पावसामुळे जवळपास ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान झाले आहे़ उर्वरित पिकेही वाळून जात असतानाच मघा नक्षत्राचा उत्तरार्ध बळीराजाला पावला़ ऐन पोळ्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे उरल्या-सुरल्या पिकांना जीवदान मिळण्याची आशा शेतकरी बाळगून आहेत़ दरम्यान, पंचागकर्त्यांनी मघा नक्षत्राबद्दलचा वर्तविलेला अंदाजही ‘लहरी’ वरुणराजाने चुकविला आहे़यंदाच्या हंगामात उदगीर तालुक्यात आजतागायत केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला आहे़ त्यामुळे जलसाठे अजूनही कोरडेठाक आहेत़ पावसाच्या पाच नक्षत्रात जेमतेम पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे खरेदी करुन पेरणी केली़ मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने कुठे दुसऱ्यांदा तर कुठे तिसऱ्यांदा पेरणी करावी लागली़ तरीही पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची नगदी समजली जाणारे उडीद, मूग ही पिके पूर्णत: वाया गेली़ सोयाबीन व अन्य पिके वाळून जाण्याच्या मार्गावर असतानाच ‘मघा’ नक्षत्राने बळीराजाला मदतीचा हात दिला़ ‘तुझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई़़़’ या काव्यपंक्तीप्रमाणे मघाच्या उत्तरार्धात झालेल्या या पावसामुळे भुई नवतेजाने बहरु लागली आहे़सोमवार व मंगळवार अशा दोन्ही दिवशी उदगीर तालुक्यात पाऊस झाला़ सोमवारी उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस नागलगाव मंडळात ९० मिमी इतका झाला आहे़ पाठोपाठ मोघा मंडळात ६९, नळगीर भागात ३५, उदगीर १३, वाढवणा २१, देवर्जन व हेर भागात प्रत्येकी ५ मिमी इतका पाऊस झाला आहे़(वार्ताहर)कोल्ह्यास साधारणत: धूर्त अशी उपाधी मानवानेच दिली आहे़ परंतु, याच कोल्ह्याने मानवाला काही अंशी दिलासा दिला आहे़ मघा नक्षत्राचे वाहन कोल्हा असून, या नक्षत्राच्या अखेरीस होत असलेल्या समाधानकारक पावसाने मदतीचा हात मिळाला आहे़ तत्पूर्वीच्या मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य व अश्लेषा नक्षत्रात केवळ ३० टक्के इतकाच पाऊस झाला होता़४मघा नक्षत्राच्या पूर्वार्धात चांगला पाऊस होइल, नंतर हुलकावण्या देईल, ओढ धरेल, असा अंदाज पंचागकर्त्यांकडून वर्तविण्यात येत होता़ परंतु, मघाचा पूर्वाधच कोरडा जाऊन उत्तरार्ध मात्र चांगल्या पावसाचा जात असल्याने वरुणराजांनी आपल्या लहरी स्वभावाद्वारे पंचागकर्त्यांचाही अंदाज चुकविला असल्याची चर्चा सुरु आहे़गेल्या दोन दिवसांपासून जळकोट व देवणी तालुक्यातही पावसाला सुरुवात झाली आहे़ अतनूर व परिसरातही मंगळवारी पाऊस झाला़ मात्र, खरीपाचे झालेले नुकसान या पावसाने भरुन येणार नाही़ संभाव्य नुकसान मात्र टळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे़