शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

अजीत चंदनशिवे , तुळजापूर तुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो.

अजीत चंदनशिवे , तुळजापूरतुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो. नगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ साली शहरात मुलांची संख्या १ हजार ३९ तर मुलींची संख्या ८८९ एवढी असल्याचे पुढे आले आहे.जानेवारी ते जून २०१६ ते या कालावधीत जानेवारी- पुरुष ८०, महिला ७५, फेब्रुवारी- पुरुष ८१, महिला ५८, मार्च- पुरुष ७७, महिला ७८, एप्रिल- पुरुष ७२, महिला- ८२, मे- पुरुष ८६, महिला ६७, जून- पुरुष ७१, महिला ५९ असे पुरुष एकूण ४६८ तर महिला ४१९ अशी जन्मसंख्या आहे. बेटी बचाव, देश बचाव, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, अशी जनजागृती होत असली तरी तुळजापुरात स्त्री-पुरुष जन्मदराची ही परिस्थिती पाहता भविष्यात ही बाब चिंताजनक असल्याचे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. महिलांसाठी विविध योजना शासनाने निर्माण केल्या आहेत. मुलांबरोबरच मुलींकडे लक्ष दिल्यास सामाजिक संतुलन कायम राखण्यास मदत होईल असे मतही डॉ. चाकुरकर यांनी व्यक्त केले.लोकांनी मुलींच्या जन्माविषयी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तसेच सोनोग्राफी केंद्रात जर गर्भलिंग निदान होत असल्याची शंका अथवा माहिती असेल तर ‘आमची मुलगी डॉट कॉम’ या वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. परंतु मुलींच्या जन्माचे स्वागत अत्यल्प प्रमाणात केले जात आहे.हुंडा पध्दत मोडीत काढा ४आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कुटुंबही आपल्या मुलीला नोकरदार चांगल्या कुटुुंबातील मुलगा मिळावा यासाठी लाखो रुपये हुंडा, सोने, चांदी देण्यासाठी तयार होतो. अशा प्रकारामुळेच मुली नकोत असा अनेकांना वाटते. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी हुंडा पध्दत मोडीत काढायला पाहिजे. तुळजापूरकरांनी आता यासाठी पुढाकार घ्यायला हवा.