ब्राह्मण महिला मंच आणि पुरोहित संघटना यांच्या वतीने न्यू श्रेयनगर सभागृहात भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. राजू वैद्य यांनी सपत्नीक परशुराम पूजन केले. यावेळी शिल्पा वाडकर, सागर वाडकर, मकरंद कुलकर्णी, महेश जोशी, प्रवीण कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
महालक्ष्मी चौक
सिडको एन-२ येथील महालक्ष्मी चौकातील दुर्गामाता मंदिरात भगवान परशुराम जन्मोत्सव, महात्मा बसवेश्वर जयंती व छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभिषेक कादी, दत्तात्रय घन, सुनील जाधव , सुनील खोचे आदींची उपस्थिती होती.
ब्राह्मण युवक सेनेतर्फे प्रतिमापूजन
ब्राह्मण युवक सेनेतर्फे परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्याबरोबर भगवान परशुराम स्तोत्रपठण करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. यावेळी डॉ. वैशाली पाटील मसलेकर, संजय जोशी, मिथुन व्यास , मंगेश मुंगीकर, अध्यक्ष योगेश जोशी आदींची उपस्थिती होती.