शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅलोपॅथीच्या जगात आयुष तग धरून

By admin | Updated: May 29, 2014 00:39 IST

शिरीष शिंदे , बीड आजच्या धावत्या युगात मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाणही त्याच पटीत वाढले आहे.

शिरीष शिंदे , बीड आजच्या धावत्या युगात मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यामुळे आजारांचे प्रमाणही त्याच पटीत वाढले आहे. आजार मुळापासून नष्ट होण्यासाठी अनेकजण प्रभावी उपचार पद्धती म्हणून आयुषला प्राधान्य देत आहेत. या संर्दभात जिल्हा रुग्णालयातील आयुषचे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सचिन वारे यांनी‘लोकमत’शी खास मुलाखात दिली. आयुष सर्दभात बोलताना डॉ. वारे म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेर्तंगत जिल्ह्यात आयुष पॅथीला सुरुवात झाली. आयुष अंर्तगत आर्युवेद, योगा, युनानी व होमिओपॅथी या चार पॅथी द्वारे रुग्णांवर उपचार केले जातात. आयुषला जिल्ह्यात २००९ सालामध्ये सुरुवात झाली होती मात्र त्याचे प्रत्यक्ष काम २०१० मध्ये सुरुवात झाले. मानवी जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. त्यातुलनेत आजारांचे प्रमाणही तसेच वाढलेले आहे. अनेकरुग्ण रुग्ण आयुष उपचार पद्धती घेत असल्याचे समोर आले असल्याचे डॉ. वारे यांनी सांगितले. अ‍ॅलोपॅथीचा प्रचार व प्रसार, तसेच त्यात होणार संशोधन अशा परिस्थितही आयुष उपचार पद्धती आपले स्थान कायम बनवुन आहे. आयुषचा उपचार घेणार्‍या संख्या पाहिली असता लाभ घेणार्‍या रुग्णांची संख्या वर्षागणिक वाढतच गेलेली असल्याचे आकडेवारीनुसार समजुन येते. २०१०-११ मध्ये १ लाख ४० हजार ८७७, २०११-१२ साली १ लाख ९६ हजार ३८६, २०१२-१३ साली २ लाख ५३ हजार ०१६ तर २०१३-१४ मध्ये २ लाख ८८ हजार ४३३ ऐवढ्या रुग्णांनी आयुष योजनेचा लाभ घेतला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी केज या उप-जिल्हा रुग्णालयात तर पाटोदा, आष्टी, माजलगाव व धारुर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आयुषच्या पॅथीद्वारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पॅथीसाठी ३ डॉक्टरर्स नेमण्यात आले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात असणार्‍या आयुष कक्षात सुरु असलेल्या पॅथीद्वारे उपचार केले जात आहे. निसर्ग उपचार पद्धतीद्वार पंचकर्म, शिरोधारा, स्रेहल स्वेदन, होमिओपॅथीद्वारे मुतखडा, महिलांच्या गर्भाषयाचे आजार, बालरोग, त्वचा विकार, संधिवात आदी आजरांवर उपचार केले जात आहेत. युनानी पद्धतीद्वारे,पित्ताचे आजार, जठराचे आजार, सांधे दुखी, मुतखडा, दमा, अ‍ॅलर्जी आदीवर उपचार केले जातात. तसेच योग पद्धती कशा करायच्या त्याचेही प्रशिक्षण देण्यात येते. आयुषसाठी आरोग्य विभागाच्यावतीने भरपुर गोळ्या-औषधी देण्यात येतात. त्यामुळे आयुषमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत नाही. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गौरी राठोड यांच्या कार्यकाळात आयुष कक्ष स्थापन झाला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोगले यांच्या सहकार्यातुन आयुषचे कार्य अखंडपणे सुरु आहे.