शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

कार्यारंभ आदेशाअभावी रखडली रोजगार हमी योजनेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:51 IST

कामाच्या शोधार्थ मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़ 

ठळक मुद्देरोहयो कामांचा कागदी खेळ ३ हजार १३३ कामे मंजूर

गंगाखेड (परभणी ) :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेंतर्गत ग्रामीण वर्षात चालू वर्षात प्रस्तावित केलेल्या ३ हजार ५३३ कामांपैकी मंजूर करण्यात आलेल्या ३ हजार १३३ या मंजूर कामांना अद्यापही कार्यारंभ आदेश मिळाला नाही़ त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण असलेल्या कामांवर बोटावर मोजण्या एवढेच मजूर कार्यरत असल्याने कामाच्या शोधार्थ मजुरांनी शहराकडे धाव घेतली आहे़ 

गंगाखेड तालुक्यात शेतकऱ्यांनी व ग्रामीण भागातील नागरिकांनी रोहयो अंतर्गत वैयक्तीक व ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री घरकूल योजना, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, निर्मल शोष खड्डे, शौचालय, तुती लागवड, शेततळे, ढाळीचे बांध, फळबाग, व्हर्मीकम्पोस्ट, नाडेप कम्पोस्ट आदी कामांचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे प्रस्तावित केले होते़ यामध्ये २०१६ पासून ते मार्च २०१९ पर्यंत सिंचन विहिरीचे ४७३, विहीर पुनर्भरणाचे १४६, निर्मल शोष खड्डे २४८, पंतप्रधान घरकूल योजनेचे १ हजार ५५, शौचालय ९८, जिल्हा रेशीम विभागाच्या तुती लागवडचे १२०, ढाळीचे बांध २४, फळबाग ८६, व्हर्मी कम्पोस्ट ५७०, नाडेप कम्पोस्ट ७१३ आदी कामांचा समावेश होता़ यात ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत मोजक्याच कामांना मंजुरी देण्यात आली होती़ वरील यंत्रणांमार्फत चालणाऱ्या रोजगार हमीच्या कामांना पंचायत समिती कार्यालयातून अद्यापही कार्यारंभ आदेश दिले गेले नसल्याने मंजूर झालेली कामे कागदोपत्रीच आहेत़ रोजगार हमी योजनेंर्गत मंजूर झालेल्या विविध भागांच्या ३ हजार १३३ कामांना तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन मंजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मजूर वर्गातून होत आहे़