शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक उन्नतीमध्ये कामगार रंगभूमीचे योगदान अतुलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:55 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि.२८) सुरुवात झाली. २१ दिवस चालणा-या या महोत्सवाचे ज्येष्ठ रंगकर्मी विजया शिरोळे यांच्या हस्ते ललित कला भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार नाट्य महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि.२८) सुरुवात झाली. २१ दिवस चालणा-या या महोत्सवाचे ज्येष्ठ रंगकर्मी विजया शिरोळे यांच्या हस्ते ललित कला भवन येथे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अनुराग कल्याणी, तर व्यासपीठावर डॉ. ज्ञानदा कुलकर्णी, प्रा. किशोर शिरसाठ, कैलास टापरे, सहायक कल्याण आयुक्त भालचंद्र जगदाळे उपस्थित होते.महोत्सवाचे यंदा ६५ वे वर्ष आहे. ‘कामगार रंगभूमीने मराठी नाट्य क्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी व सांस्कृतिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी कायमच या रंगभूमीने योगदान दिले असून, ते अतुलनीय आहे. गेल्या ६५ वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन शिरोळे यांनी केले.कामगार नाट्य महोत्सवाच्या उद्घाटनाचा बहुमान परळी येथील कामगार कल्याण केंद्राला मिळाला. त्यांचे रानबा गायकवाडलिखित ‘फोटोसेशन’ नाटक पहिल्या दिवशी सादर करण्यात आले. २८ डिसेंबर ते १८ जानेवारीदरम्यान एकूण २१ नाटकांचे प्रयोग या महोत्सवात होणार आहेत. त्यामध्ये अजित दळवी, नवनाथ पवार, प्रेमानंद गज्वी, व्यंकटेश माडगूळकर, सुमित तौर, योगेश सोमण अशा लेखकांचे नाटक रंगमंचावर उभे राहणार आहे.आज नाटक : पुस्तकाच्या पानातूनमहोत्सवामध्ये शुक्रवारी रविशंकर झिंगारेलिखित ‘पुस्तकाच्या पानातून’ हे नाटक सादर होणार आहे. सेलूच्या कामगार कल्याण भवनतर्फे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उस्मानपुरा येथील ललित कला भवन येथे सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोगाला सुरुवात होईल.