शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूचा कलेक्टर आॅफिसवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:11 IST

कामगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटूने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कामगारांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सीटूने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांतीचौकातून हा मोर्चा निघाला. पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, शहागंजमार्गे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी व विशेषत: महिला कामगारांनी लक्षणीय सहभाग घेतला. अ.भा. सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार देशभर आंदोलनाचा एक भाग म्हणून राष्टÑीय १२ मागण्या आणि स्थानिक चार मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. द्वारसभा, पत्रक वाटप, पोस्टर-स्टीकर, बॅनरद्वारे रेल्वे स्टेशन एआयडीसी, चितेगाव एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, चिकलठाणा एमआयडीसी व शेंद्रा एमआयडीसीत मोर्चाचा प्रचार करण्यात आला होता.जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सीटूचे राज्य उपाध्यक्ष उद्धव भवलकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. येत्या ९ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत महापाडाव आंदोलन होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबादहून पाचशे कामगार जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेत बसवराज पटणे, मंगल ठोंरे,दीपक अहिरे, दामोधर मानकापे, लक्ष्मण साक्रुडकर आदींची भाषणे झाली. शंकर ननुरे यांनी आभार मानले.कामगार संघटना कायदा १९२६, औद्योगिक विवाद कायदा १९४७, स्थायी आदेश अधिनियम इ. कायदे रद्द करून औद्योगिक संबंध बिलाच्या नियमांचा मसुदा केंद्र सरकारने मध्यवर्ती कामगार संघटनांसमोर चर्चेसाठी ठेवला होता. त्या बिलास विरोध करण्यात आला होता. कामगारांचा संप करण्याचा अधिकार संपुष्टात आणणारे असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे होते. आज मोर्चाद्वारे हेच म्हणणे मांडण्यात आले. अन्य मागण्या अशा- शेतमजुरांसह सर्व कामगारांना अठरा हजार रु. किमान वेतन द्या, वाढती महागाई व बेरोजगारी त्वरित रोखा, रेशन व्यवस्था व्यापक करा, कंत्राटी पद्धत बंद करा, समान कामाला समान वेतन द्या, राज्य व केंद्र सरकारच्या सर्व खात्यांतील रिक्त जागा तात्काळ भरा, कामगार कायद्यांची अंमलबजावणी करा, कामगार, शेतमजूर, कर्मचा-यांना मासिक तीन हजार रु. पेन्शन द्या, बोनस, भविष्यनिर्वाह निधी, बंद पडलेल्या कंपन्या चालू करा, घरकामगारांना सामाजिक सुरक्षा द्या, आदी मागण्यांचे हे निवेदन आहे.