मोहटादेवी मंदिरात सप्ताहास सुरुवात
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी मंदिरात शुक्रवारपासून (दि.२९) अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या सप्ताहात पहिल्या दिवशी ह.भ.प. बालगिरी महाराज यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन केले. यावेळी बजाजनगर परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाटोदा शिवारात वराहांचा सुळसुळाट
वाळूज महानगर : पाटोदा शिवारात वराहाचा सुळसुळाट वाढला असून शेतातील पिकांची वराहकडून नासाडी होत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतातील पालेभाज्या, ऊस, हरभरा, गहू आदी पिकाची वराह नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
रांजणगावातून कामगार बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथून कामगार बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. विशाल सुरेश भागीले (२५ रा.रांजणगाव) हे १४ जानेवारीला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेले आहे. सर्वत्र शोध घेऊनही अद्यापपर्यंत विशाल भागीले हे घरी न परतल्याने त्यांची पत्नी भारती भागीले यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
--------------------------