शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दोन महिलांसह कार्यकर्त्यांचे मुंडण

By admin | Updated: December 4, 2014 00:54 IST

लातूर : जवखेडा खून प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून जाधव कुटुंबियावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसह लातुरात दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या

लातूर : जवखेडा खून प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करून जाधव कुटुंबियावर होत असलेला अन्याय थांबविण्यात यावा, या मागणीसह लातुरात दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दोन महिला व दीडशे कार्यकर्त्यांनी बुधवारी धरणे आंदोलनात मुंडण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनात शांताबाई धावारे, लक्ष्मी काकणे यांनी मुंडण केले. रिपाइंचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, जी.ए. गायकवाड, विनोद खटके, रुपेश गायकवाड, पप्पू कांबळे, जितेंद्र बनसोडे, महादू गायकवाड, रणधीर सुरवसे, दत्ता कांबळे, अ‍ॅड.डी.एम. गायकवाड, गौतम कांबळे, विशाल भोसले, धम्मपाल इंगळे, नितीन मोरे, नितीन कदम, सिद्धार्थ सूर्यवंशी, शक्ती मोरे, दिलीप सातपुते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मुंडण करून जवखेडा खून प्रकरणाचा निषेध केला. शिवाय, लातुरात निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच तीन पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनात साधू गायकवाड, अमोल कारंजे, विजय बनसोडे, राम कोरडे, राहुल लातूरकर, एस.टी. चांदेगावकर, अनिल शिंदे, अ‍ॅड. अतिश चिकटे, बबिता गायकवाड, सखुबाई लातूरकर, शिलाबाई सिरसाट, शोभा सोनकांबळे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)धरणे आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जवखेडा येथील जाधव कुटुंबियावर होत असलेला पोलिस अत्याचार थांबविण्यात यावा, राज्यातील दलित बौद्ध समाजाला संरक्षण देण्यात यावे, महाराष्ट्रातील तंटामुक्त समित्या रद्द करण्यात याव्यात, या मागण्या केल्या. जवखेडा प्रकरणी लातुरात काढण्यात आलेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे लादून पोलिस प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. त्याबद्दल पोलिस अधीक्षकांसह गांधी चौक, शिवाजी चौक आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवाय, मोर्चामुळे झालेल्या नुकसानीला मोर्चाला जबाबदार न धरता प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे आणि त्याची वसुलीही जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडून करावी, अशी मागणीही आंदोलनात झाली.