शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे ३ वाजता दिली वर्कआॅर्डर

By admin | Updated: September 4, 2016 01:06 IST

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : शहरातील ४० हजार पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीला महापालिकेने शुक्रवारी पहाटे ३ वाजता वर्कआॅर्डर दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रभर महापालिका कार्यालय सुरू ठेवून वर्कआॅर्डर देण्याची एवढी घाई कशासाठी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने आताच वर्कआॅर्डर द्या, असेही मनपाला बजावलेले नाही. २४२ कोटींचा निव्वळ तोटा या ठेक्यामुळे होत असताना प्रशासनाने संयमाची भूमिका का घेतली नाही, असे एक ना अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.महापालिकेत मागील काही दिवसांपासून पदाधिकारी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष सुरू आहे. त्यातच एलईडी प्रकरणाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना आयते कोलीत मिळाले आहे. शनिवारी पुन्हा एकदा महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी प्रशासनावर तोफ डागली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एलईडीची वर्कआॅर्डर ठेका इलेक्ट्रॉन लाईटिंग सिस्टीम प्रा. लि. तथा पेरॉगॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या कंपनीला द्यावा, असे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी न करता तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ११२ कोटींची निविदा ३८ कोटींवर आणली. नंतर ही निविदा सर्वसाधारण सभेसमोर आणून रद्द केली. या निर्णयाची कोणतीही कल्पना सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने मनपावर अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर मनपाने पुनर्विलोकन याचिका दाखल केली. तेव्हापर्यंत न्यायालयात प्रकरण बरेच विरोधात गेले होते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावताच मनपातील अधिकाऱ्यांनी पहाटे ३ वाजता कंपनीला वर्कआॅर्डर देण्यात आली.मनपाने निविदा तयार करताना अनेक त्रुटी ठेवल्या होत्या. निविदा प्रक्रियेत दर महिन्याला कंपनीला २ कोटी ७२ लाख रुपये देण्याचे म्हटले आहे. मनपाच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर आपोआप कंपनीच्या खात्यात रक्कम वर्ग होईल. करार रद्द करण्याची अटच टाकली नाही.मागील वर्षभरात मनपाने वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून पथदिव्यांचे काम करून घेतले. १०० पेक्षा अधिक कामे विविध खाजगी एजन्सीमार्फत मनपा करून घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही वर्कआॅर्डर देण्यात येत नसल्याचा दावा कंपनीने न्यायालयात पुराव्यास केला. कंपनीने मनपाच्या १०० पेक्षा अधिक कामांची यादीच सादर केली. ही यादी कंपनीला कोणी पुरविली, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मनपातील पंक्चर कोण आहेत हे प्रशासनाने शोधून काढावे, अशी मागणी मनपा पदाधिकाऱ्यांनी केली.तर चक्क दिवाळे निघेल...४एलईडीची निविदा काढताना मनपाने कंपनीच्या कोट्यवधी रुपयांचा कसा फायदा होईल हेच पाहण्यात आले. ११२ कोटींचे काम अवघ्या ३८ कोटींमध्ये आज होऊ शकते. मनपाला एकूण २६१ कोटी रुपये कंपनीला या कामासाठी द्यावे लागणार आहेत. ४दर महिन्याला ४ कोटी रुपये देणे अशक्य आहे. या निर्णयाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातील जादा न्यायमूर्र्तींकडे पुन्हा एकदा याचिका दाखल करणे शक्य आहे. मनपाला आज या निर्णयामुळे २४२ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शहराच्या हितासाठी हेसुद्धा करून पाहता येईल, असेही महापौर, उपमहापौरांनी नमूद केले.