शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

दुष्काळात मिळतेय हजारो मजुरांना काम

By admin | Updated: December 22, 2014 00:58 IST

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून अनेक जण स्थलांतर करत आहेत.

गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून अनेक जण स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांना स्थानिक पातळीवरच काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत हजारो मजुरांना काम देण्याचा प्रयत्न सुरु आहे. दर आठवड्यात साधारणपणे ६ हजार मजुरांना कामे देऊन त्यांना दुष्काळात सावरण्याचा प्रयत्न सुरु आहे.जिल्ह्यात ९२९ गावांमध्ये अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात स्थिती भयावह आहे. पाणीटंचाई व नापिकीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे म्हणून जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. त्यात तालुकानिहाय प्रत्येक गावातील मजुरांना काम मिळेल यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले. योजना सुरु झाल्यापासून २० हजार २२५ कामे सुुरु आहेत. आजपर्यंत आठही तालुके मिळून १३ हजार १९६ मजुरांना काम देण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंतचा अहवाल पाहता अंबड ९, बदनापूर १, भोकरदन ७, घनसावंगी ७, जालना १४, मंठा २९, परतूर ५१ मिळून ११८ कामे सुरु आहेत. या कामांवर गत आठवड्यात ६०५४ मजुरांना काम देण्यात आले. तहसील व पंचायत समितीस्तरावरुन ही कामे करण्यात येत आहे. कुशल व अकुशल मजुरांकडून कामे करुन घेण्यात येत आहेत. अंबड, ६१.११, बदनापूर ३१.३३, भोकरदन ४०.६४, घनसावंगी ५२.०८, जाफराबाद ५१.८२, जालना ३०. ९९, मंठा ४२.३२, परतूर ३१.३९ लाख मिळून ३९ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.४महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आठही तालुके मिळून ३ हजार ९५४ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. यात प्रामुख्याने अंबड ३०३, बदनापूर १०४३, भोकरदन १०७९, घनसावंगी ४७६, जाफराबाद- २८३, जालना - २०० , मंठा ५५, परतूर ४८५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, ८ हजार ६३७ विहिरींपैकी ४ हजार ७१३ विहिरींची कामे अपूर्ण आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून सिंचन विहिरी, लघू तसेच मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे, तुतीलागवड, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावगड करणे, वैयक्तिक शौचालय बांधणी तसेच फळबाग लागवड आदी कामे राबविली जात आहेत. याकामात हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.