शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उड्डाणपुलाचे काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:39 IST

रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वाळू आणि खडीचा अनधिकृत साठा केल्याने तसेच ठेकेदाराने शेत जमिनीचा वापर करताना अकृषिक कर भरला नसल्याचे कारण पुढे करीत भोसले यांनी ही कारवाई केली आहे. पुलाच्या कामासाठी लागणारी दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावल्याने पुलाचे काम ठप्प झाले आहे.मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. हे काम पूर्ण झाल्यास पालम नाका रेल्वे फाटकावरील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे. २०१९ पर्यंत काम पूर्ण करुन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने कामाला गती दिली होती. मात्र २७ आॅगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी शहरापासून जवळ असलेल्या इसाद रोडवर ए.जी.कन्स्ट्रक्शनच्या साईटवर छापा टाकून तेथील आणलेली वाळू व खडी कोणाकडून खरेदी केली, अशी विचारणा करीत मिक्सर, जेसीबी मशीन जप्त करुन पोलीस ठाण्यात लावले. दुसरे दिवशी साईटवर असलेल्या खडी आणि वाळूचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर ए.जी.कन्स्ट्रक्शनच्या नावे ८७ लाख ४५ हजार ५०० रुपयांच्या दंडाची नोटीस पाठविल्याची माहिती मिळाली आहे.