शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

चिकलठाण्यातून चालते २२ टपाल कार्यालयांचे काम

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

साहेबराव हिवराळे, औरंगाबाद चिकलठाणा टपाल कार्यालयांतर्गत ग्रामीणच्या २२ टपाल शाखा कार्यालयांचा कारभार अंधाऱ्या खोलीत चालत असून, कर्मचाऱ्यांना बसण्याची व कागदपत्रे ठेवण्याची तोकडी व्यवस्था आहे.

साहेबराव हिवराळे, औरंगाबादचिकलठाणा टपाल कार्यालयांतर्गत ग्रामीणच्या २२ टपाल शाखा कार्यालयांचा कारभार अंधाऱ्या खोलीत चालत असून, कर्मचाऱ्यांना बसण्याची व कागदपत्रे ठेवण्याची तोकडी व्यवस्था आहे.महानगरपालिकेच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर चिकलठाणा टपाल कार्यालय असून तळमजल्यात महापालिकेचा रात्रीचा निवारा आहे. त्यामध्ये मात्र आधुनिक फरशी व सुरळीत वीज पुरवठा आहे. टपाल कार्यालय अडगळीच्या खोलीत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी टपाल कार्यालयासाठी जालना रोडवर प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. एक इमारत पसंत केली. परंतु त्या जागेवर टपाल कार्यालयाच्या वरिष्ठांसोबत फक्त चर्चाच सुरू आहे. वाकुळणी, शेकटा, चितेगाव, लाडसावंगी, पिंप्री, कचनेर, करमाड, दुधड आदींसह २२ शाखा टपाल कार्यालयांचे टपाल कर्मचारी चिकलठाणा कार्यालयात टपालाची आदान प्रदान करतात. कार्यालयाच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली असून, अंधुक प्रकाशात कारभार चालतो. जनरेटर बंद असते व वीज पुरवठा खंडित झाल्यास संगणक बंद पडतात. यामुळे टपाल कर्मचारी व ग्राहकांची गैरसोय होते. आधार कार्ड, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी अनेकजण टपाल कार्यालयात खेट्या घालतात. अतिक्रमणाच्या व अडगळीच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाची इमारतच अनेकांना सापडत नाही. सुसज्ज इमारतीत हे कार्यालय हलवावे, अन्यथा सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.स्वतंत्र इमारत हवी चिकलठाणा टपाल कार्यालयात कोणत्याही आवश्यक सुविधा नाहीत. अनेकांना कार्यालय आहे कुठे हेच समजत नाही. कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलत्या काळानुसार बदलावा. - धम्मपाल नरवडेअंधार असतो४कार्यालयाची वीज अनेकदा नसते व तेव्हा कार्यालयातील संगणक बंद पडतात. आॅनलाईन कामे होत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयात चकरा माराव्या लागतात.- नागपाल गंगावणेफरशी तुटल्याकार्यालयाभोवती अतिक्रमणे झाली आहेत. पायऱ्या तुटल्यामुळे वृद्धांचे पाय घसरून अपघात होण्याची भीती असून इमारतीच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष जाणवते, त्यामुळे कार्यालय इतरत्र हलवावे. - संतोष पारखे