शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १६ नळ योजनांची कामे सुरू

By admin | Updated: August 25, 2016 23:40 IST

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या आर्थिक वर्षात १७ ठिकाणी नळयोजनांची कामे सुरू केली असून त्यापैकी १ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या आर्थिक वर्षात १७ ठिकाणी नळयोजनांची कामे सुरू केली असून त्यापैकी १ पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.या योजनासाठी एकत्रित साडेतीन कोटींचा निधी लागणार असून ही कामे आता प्रगतीत आहेत. यावर आतापर्यंत १.४२ कोटी एवढा खर्च झाला आहे.यामध्ये औंढा तालुक्यातील टाकळगाव तर्फे शहापूर, केळी तांडा, दुघाळा, ढेगाज, पाझर तांडा, वसमत तालुक्यातील चिखली, लोण बु., सिरली, हिंगोली तालुक्यातील भिरडा, डिग्रस कऱ्हाळे, पिंपळदरी तर्फे बासंबा, पहेनी, कळमनुरी तालुक्यातील दाभडी, सेनगाव तालुक्यातील बन, वझर खु., वायचाळ पिंप्री, खुडज या गावांचा समावेश आहे.पाणीपट्टीच्या हमीनंतरच दुरुस्तीजिल्ह्यातील सिद्धेश्वर २३ गाव, पुरजळ २0 गाव, गाडीबोरी ८ गाव व मोरवड २५ गाव योजनेच्या दुरुस्तीसाठी ८.५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. या योजनेचे पाणी अनेक गावांत मिळत नाही. मात्र आता दुरुस्तीची संधी उपलब्ध झाल्याने अशा गावांतही पाणी जाण्याची आशा आहे. परंतु शिखर समितीतील जी गावे ७0 टक्के पाणीपट्टी भरण्याची हमी देतील, अशांनाच या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेअंतर्गतची किती गावे यात सहभागी होतील, याचा सर्व्हे करण्याची प्रक्रिया सुरु आहे.