शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी जाणून घेतल्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स

By admin | Updated: August 9, 2014 01:09 IST

औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित व्याख्यानातून सखी मंचच्या सदस्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स जाणून घेतल्या. लोकमत

औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित व्याख्यानातून सखी मंचच्या सदस्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स जाणून घेतल्या. लोकमत हॉलमध्ये रूपाली सावजी महिलांना अगदी सोप्या भाषेत व्याख्यान देताना म्हणाल्या की, जीवन जगताना एकदम मोठे ध्येय ठेवून मुलांवर दबाव आणू नका, जेणेकरून तोे गुणवत्तेपासून दूर जाईल. कारण योग्य नियोजन व स्मार्ट कामामुळेच यशप्राप्ती होते.महिलांनी रोजच्या रोज आपल्या कामाचे टिपण ठेवा, घरात कोणत्या कामाला प्राधान्यक्रम द्यायचा हे विसरू नका, म्हणजे स्वत:साठीही वेळ काढता येईल आणि तुमचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसेल. तणावाखाली घरात काम करताना चिडचिड वाढते अन् दिवस कंटाळवाणा होऊन जातो.सुट्यांचे नियोजन करून आनंदी परिवाराचे सूत्रही तुमच्याच हातात असल्याचेही रूपाली सावजी यांनी सांगितले, तर विशाल नरोटे यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर बोलताना सांगितले की, जीवनात ताणतणाव मुक्तीसाठी तुम्ही स्वत:ला बदलण्याची गरज आहे. त्यालाच सर्वजण विचारतात मला कोणीही विचारत नाही, ही भावना मनातून काढून टाका. जुन्या जमान्यात तुम्हाला शेतीपूरक कामाविषयी तरबेज असावे लागायचे.आता, संगणक व तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे आहे. पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तेच्या दिशेने पाठविणे गरजेचे असून त्यासाठी मुलांच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचे ओझे लादू नका; जेणेकरून अपेक्षाभंग झाल्यास तणाव येतो. स्वप्न आणि वास्तव यातील फरक सांगून अगदी सोप्या भाषेत महिलांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या टिप्स दिल्या. कार्यक्रमाचे सहप्रायोजक डायमंड इन्स्टिट्यूट स्पोकन इंग्लिश असून, कार्यक्रमास सखी मंचच्या सचिव अनिता कोटगिरे यांची उपस्थिती होती.