शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा छळ थांबेना..!

By admin | Updated: July 10, 2017 00:40 IST

जालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात महिलांवरील शारीरिक व मानसिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबायला तयार नाहीत. गत दीड वर्षात सासरकडील होणाऱ्या छळामुळे ३३३ संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर छेडछाड व विनयभंगाच्या ३२० घटना घडल्या आहेत. महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनासह सामाजिक स्तरावर वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी कौटुंबीक हिंसाचार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, छेडछाड, लैंगिक छळ, बलात्कार यासारख्या घटनांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात दीड वर्षात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ६७ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, विनयभंगाच्या ३२० घटनांमध्ये अनेक युवतींना मानसिक त्रासाबरोबर आपले शिक्षण, नोकरी सोडण्याचे प्रसंग घडले आहेत. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून दीड वर्षात सासरकडील मंडळींकडून तीन महिलांचे खून झाले असून, पाच महिलांच्या खुनाचाप्रयत्न झाल्याची नोंद आहे. प्रेम प्रकरण, लैंगिक संबंधास नकार, कौटुंबिक वाद यासारख्या कारणांमुळे युवती व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या २५ घटना दीड वर्षात घडल्याचे पोलीस प्रशासनाकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या अनेक घटनांची पोलीस प्रशासनाकडे नोंद होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी कायद्यांबरोबर त्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज आहे.