शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नरबळी प्रकरणात महिला जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 01:06 IST

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील बालकाच्या नरबळी प्रकरणात पोलिसांनी पुणे येथील एका महिलेला जेरबंद केले आहे़

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील बालकाच्या नरबळी प्रकरणात पोलिसांनी पुणे येथील एका महिलेला जेरबंद केले आहे़ रविवारी, सोमवारी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालक कृष्णा इंगोले याच्या हत्येचे गूढ पोलिसांना उलगडले आहे़ चिमुकल्या कृष्णाचा खून हा नरबळीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले (रा़पिंपळगाव डो़ह़मु़पुणे) व मांत्रिक लखन उर्फ राहूल चुडावकर (रा़पुणे) याला ताब्यात घेतले होते़ त्यांची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती़ त्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या प्रकरणातील धागेदोरे हाती लागल्यानंतर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी द्रोपदी उर्फ लक्ष्मी पौळ या महिलेस तर साहेबराव इंगोले या इसमाला १० एप्रिल रोजी अटक केली होती़ या दोघांची गुरूवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांना १८ एप्रिल पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पोलिसांनी गुरूवारी सुवर्णा दीपक मडाळे (रा़ पर्वती वसाहत, पुणे) या महिलेला जेरबंद केले आहे़ आजवर या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे़ या प्रकरणाचा अणखी तपास सुरू असून, इतर काही धागेदोरे, आरोपितांचा यात समावेश आहे का ? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़