शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रांजणी येथे महिलांचा हंडा मोर्चा

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रा.पं.मध्ये ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच भरीस भर नळांना पंधरा दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिलांचा उद्रेक दि. ९ रोजी दिसून आला. संतप्त महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी हंडामोर्चा काढला. मात्र त्याला सामोरे जाण्यास कोणीही नसल्याने अखेर महिलांनी ग्रा.पं.ला कुलूप ठोकून प्रशासनाचा निषेध केला.यावेळी रुखीयाबी शाह, आबेदामी शेख, जुलेका अन्वरीबी, खुर्शिदा आदीसह फकीर गल्ली भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी महिलांसोबतच ग्रा.पं. सदस्य शेख रहीम, शफीक आतार, सेनेचे उपतालुका प्रमुख रामराव देशमुख, विश्वंभर वरखडे, अंकुशराव देवकर, शकील कुरेशी, गफूर कुरेशी, रशिद शेख, खालेद शेख , सय्यद लाल आदी उपस्थित होते.जनता वाऱ्यावररांजणी ग्रा.पं. सरपंचपद जात पडताळणी प्रकरणाने रिक्त असून ग्रामविकास अधिकारी ई. टी. मुरदकर यांची परतूर पं.स.मध्ये बदली झालेली आहे. सध्या ही ग्रा.पं. सेनेकडे आहे. मात्र सेनेच्या सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने सदस्य नाराज आहेत. सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तेराव्या वित्त आयोगाचा निधी कर्च करुन मोकळे झाले असून खर्चाची जुळवाजुळव झाली नसल्याने बदली झालेल्या ग्रा.वि.अ. यांनी पद्भार सोडला नसल्याचे कळते. मागील अनेक दिवसांपासून रांजणी ग्रा.पं. बेवारस असल्याने रहिवासी, विविध प्रमाणपत्रे व इतर कामे खोळंबली आहेत. यासंदर्भात विस्तार अधिकारी झिने यांना विचारणा केली असता रांजणी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून राणीउंचेगावहून सूर्यवंशी येणार असल्याचे सांगितले. परंतू त्यांना ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार दिलेला नसल्याचे सांगितले. दरम्यान, गावातील सर्वच भागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरत आहे. ग्रामस्थांना नियोजनाअभावी बारमाही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)रांजणी ग्रा.पं.साठी ग्रामविकास अधिकारी देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती घनसावंगी पंचायत समितीचे सभापती मधुकर साळवे यांनी दिली.