शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महिला बाल रुग्णालय; शासन निधी परत जाणार

By admin | Updated: November 7, 2016 01:01 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासनाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे भव्य दिव्य रुग्णालय उभारले.

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासनाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे भव्य दिव्य रुग्णालय उभारले. त्यानंतर नवजात शिशू आणि गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रुग्णालयासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून जागा देण्यास तयार नाही. महापालिकेच्या या वृत्तीमुळे रुग्णालय उभारण्याचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. रुग्णालयासाठी शासनाकडून आलेला निधीही परत जाण्याच्या मार्गावर आहे.शहरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे काम महापालिकेचे आहे. मनपा प्रशासनाने नेहमीच ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मनपाचे आरोग्य केंद्र फक्त नावालाच सुरू आहेत. गंभीर आजारांसाठी नागरिकांना आजही घाटी रुग्णालयावरच विसंबून राहावे लागते. घाटीत दररोज ३ हजार नागरिक बाह्यरुग्णसेवेसाठी येतात. ११७७ खाटांची क्षमता असताना सुमारे १५०० पेक्षा अधिक रुग्ण दाखल करून घ्यावे लागतात. घाटी रुग्णालयावरील हा भार कमी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिकेने मध्यवर्ती जकात नाका येथे बीओटी तत्त्वावर २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची घोषणा केली. नेहमीप्रमाणे ही घोषणा हवेतच विरली. एकाच छताखाली विविध आजारांच्या चाचण्या करून देण्याची घोषणा राजकीय मंडळींनी केली. ही घोषणाही राजकीय स्वरुपाचीच ठरली. रुग्णसेवेच्या बाबतीत महापालिका किती गंभीर आहे, हे अनेक घोषणांवरून दिसून येते.चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने चिकलठाणा येथे २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करून टुमदार रुग्णालय उभारण्यात आले आहे. आता हे रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास घाटीवरील ताण किंचित कमी होईल.दोन वर्षांपूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने नवजात शिशू आणि गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी २०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. रुग्णालयासाठी शहरी भागात कुठेही मनपाने ७ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आरोग्य विभागाने केली आहे.मागील दोन वर्षांपासून महापालिकेने ७ एकर जागा उपलब्ध करून न दिल्याने रुग्णालयाचा प्रश्न लालफितीत अडकला आहे. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा पत्र पाठवून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी सातारा-देवळाई भागात मनपा प्रशासनाने ७ एकर जागा द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे सहा महिन्यांपूर्वीच केली आहे.