जालना : जुना जालन्यातील टीव्ही सेंटर, म्हाडा कॉलनी सटवाई तांडा या भागातील नळ जोडणीच्या मागणीसाठी मंगळवारी येथील पालिका कार्यालयावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला.सर्वे क्रमांक ४८८ या परिसरात शेकडो कुटुंब वास्तव्याास आहे. परंतु या भागास पालिकेद्वारे पाणीपुरवठा होत नाही. वारंवार मागणी करुनही प्रशासनाने या कडे सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी मंगळवारी पालिका कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक मारली. नळ जोडणी द्यावी, यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांच्या एका शिष्ट मंडळाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी सविता किवंडे, राधाताई वाढेकर, अनिता खोडवे, शोभा खोत, विजया शंकरपाळे, रंजना सोनवणे, शांताबाई गुंजकर, उषा डोंगरदिवे, सविता हिवाळे, सुमन इंचेकर, शोभा रंधवे आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)
नळजोडणीसाठी महिलांचा मोर्चा
By admin | Updated: July 10, 2014 01:02 IST