शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

महालकिन्होळा येथे दारूविक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार

By admin | Updated: July 4, 2017 00:06 IST

वडोदबाजार : घरातीलच सदस्य असलेल्या तळीरामाकडून होणारा सततचा त्रास असह्य झाल्याने गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूमुक्त गाव करण्यासाठी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्याच घरातून दारूच्या बाटल्या फोडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवडोदबाजार : घरातीलच सदस्य असलेल्या तळीरामाकडून होणारा सततचा त्रास असह्य झाल्याने गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूमुक्त गाव करण्यासाठी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्याच घरातून दारूच्या बाटल्या बाहेर काढून रस्त्यावर फोडल्या. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महालकिन्होळा (फर्शी) येथील महिलांनी अवैधरीत्या दारू विक्रेत्यांविरुद्ध ग्रामसभा घेऊन आवाज उठविला. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी पोलीस चौकीसाठी दिलेल्या जागेवरच दारू विक्री होत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व वडोदबाजार पोलिसांचे दुर्लक्ष आहे. औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्शी फाटा येथे रस्त्यावरच घरे असलेल्या तीन कुटुंबांकडून अनेक वर्षांपासून देशी दारूची अवैधरीत्या विक्री केली जाते. न्यायालयाने राज्य मार्गावरील बीअर बार बंद केल्यापासून विदेशी दारू विक्रीसुद्धा सुरू आहे. सदरच्या दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र कारवाईनंतर सुटून घरी परतताच ते दारू विक्री करतात. महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनचालकांना सदर ठिकाणी सहज दारू मिळत असल्याने गावातील व रस्त्याने ये- जा करणाऱ्यांना २४ तास येथे दारू मिळत असते. त्यामुळे तळीराम झिंगलेल्या अवस्थेत पडलेले असतात. दारूच्या व्यसनामुळे अनेकांच्या घरात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने गत १५ दिवसांपासून गावातील महिलांच्या मनात अवैध दारू विक्रीविरुद्ध खदखदीने अखेर सोमवारी रौद्र रूप धारण केले. यानंतर अवैध दारूसह परवानाधारक विदेशी दारूचे दुकानही कायमचे बंद करण्यात यावे, असा ठराव सोमवारी महिलांच्या विशेष ग्रामसभेत पारित झाला. ग्रामसभा झाल्यावर महिलांनी थेट राज्य मार्गावरील अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरात घुसून देशी दारूचे बॉक्स बाहेर काढून शेकडो बाटल्या रस्त्यावर फोडल्या. एका घरातून तर देशी दारूसह विदेशी दारूच्या बाटल्या महिलांना मिळून आल्या. आज महिलांची आक्रमकता पाहून अनेक तरुण मुले, पुरुषही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. दारूच्या काही बाटल्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील इतर गावांतील अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. कुठल्याही परिस्थितीत गाव दारूमुक्त करायचे आहे, अशी संकल्पना महिलांनी मनाशी बांधून वेळ पडल्यास मतदान घेण्याची तयारी दर्शविली आहे. महिलांनी वडोदबाजार ठाण्यात धाव घेऊन कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना सरपंच वंदना पंडित पारखे व ग्रामसेवक आर. एस. पवार यांची स्वाक्षरी असलेले निवेदन दिले.