शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भोकरदनमध्ये वीस ग्रामपचायतींमध्ये महिलाराज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:31 IST

३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.

भोकरदन : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी येथील नगरपरिषद कार्यालयात मतमोजणी झाली. ३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.तीन ग्रामपचंयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे २९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले.निवडणुकीत प्रतिष्ठेच्या असलेल्या राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळविला तर सावंगी अवघडराव ही भाजपाच्या ताब्यातील ग्रामपचयंत राष्ट्रवादी व शिवसेनेने ताब्यात घेतली आहे़ गोकुळ ग्रामपचंयतीमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान सरपंच समाधान शेरकर यांनी स्वप्नील शेळके यांचा केवळ ५ मताने पराभव केला. त्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. यात शेरकर विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.विजयी सरंपच :जवखेडा खुर्द- यंशवत बनसोडे (बिनविरोध)गव्हाण संगमेश्वर - विशाल ढवळे (बिनविरोध) ,मनापूर- कासाबाई लक्ष्मण दळवी (बिनविरोध)जवखेडा बु- इंदबाई कुंडलिक पवार,कठोरा जैनपूर-सुरजाबाई बिसन जाधव,राजूर- भाऊसाहेब भुंजग,चोºहाळा-मासनपूर- कमल संतोष लोखंडे,वडशेद- श्रीरंग भवर,निंबोळा- दिलीप लंबे,ताडकळस- सुरमाबाई शंकर जाधव,पिंपरी- कांताबाई विष्णू आंभोरे,करजगाव- मनोहर कानडे,वरूडु बु- कौशल्याबाई सिरसाठ,गोकुळ- समाधान शेरकर,वालसा- डावरगाव -समाधान वाघ,पद्यमावती- रमेश तराळ,एकेफळ- वर्षा शिवाजी गव्हाड,तपोवन- छायाबाई रामलाल चव्हाण,खामखेडा- मंगलाबाई गजानन नागवे,पळसखेडा- दाभाडी परमेश्वर खरात,भिवपूर- सरला खंडु जाधव,कोठाकोळी- आंबादास बावस्कर,देहेड- भारती तान्हाजी बावस्कर,नांजा- भागुबाई चंद्रकांत मोरेसांवगी अवघडराव- रबियाबी करीम,रेलगाव- सुमनबाई यादवराव मिसाळ,शेलूद- तडवी आशा इसाक,पिंपळगाव बारव- कैलास सखाराम जाधव,लतिफपूर- शेख अरशियाबी रबीब,मोहळाई- सांडू मारोती पालकर,वालसा खालसा- संजय लक्ष्मण जाधव (शिवसेना) दिपाली बप्पासाहेब उदरभरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.राजूरच्या सरपंचपदी भाऊसाहेब भुजंग विजयीराजूर : राजूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. भाजपने अकरा सदस्यपदांच्या जागा मिळवल्या तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्टÑवादीला एकही जागा मिळवता आली नाही. राजूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तिरंगी लढत झाली. यामधे भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. राष्टÑवादी काँग्रेसचे सांडू पुंगळे दुस-या तर शिवसेनेचे विनायकराव पुंगळे तिस-या क्रमांकावर राहीले. सदस्य पदी राहुल दरक, रामेश्वर सोनवणे, ताईबाई दादाराव मगरे, शेख मुसा शेख रहेमान, सुशिलाबाई भुजंग, चंद्रकलाबाई कृष्णा जाधव, संगिता आप्पासाहेब पुंगळे, अनिता निवृत्ती पुंगळे, रामबाई शिवाजी जगताप, विष्णु राज्यकर, लहानूबाई बबन मगरे, विनोद डवले, जीजाबाई त्रिंंबक मगरे यांनी विजय मिळवला.