शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

बाटली आडवी करण्यासाठी सरसावल्या रणरागिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:22 IST

बड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले.

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. त्यामुळे गावातील हे दुकान बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.रोहिलागड येथे पंधरा आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तसेच या पूर्वी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली होती. मात्र, दारूबंदी न झाल्यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी कायदेशीर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. त्यामुळे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या उपस्थितीत गावात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला गावातील सुमारे दीड हजारांवर महिला उपस्थित होत्या. दारूबंदीच्या ठरावासाठी ८४२ महिलांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी मतदान केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सरपंच अश्विनी वैद्य, ग्रामपंचायत सदस्य बद्री टकले, लताबाई टकले, सुरेश पाटील, किशोर टकले, प्रल्हाद वैद्य, राम दुधाटकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना एकत्र बोलावून दारूचे दुकान बंद न करण्यास कुणाचा आक्षेप आहे का याबाबत विचारणा केली. मात्र, सर्व महिलांनी गावातील दारूचे दुकान बंद व्हायलाच पाहिजे , असा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी दुकान बंद करण्यात येईल, असे जाहीर केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव, निरीक्षक एस.आर. फटागडे, जे. एम. खिल्लारे, दुय्यम निरीक्षक आर.डी. गायकवाड, व्ही. के. चाळणेवार, विस्तार अधिकारी बी. जी. गुंजाळ, गटविकास अधिकारी यु. एन. जाधव यांनी कार्यवाही पूर्ण केली.यासाठी बाप्पासाहेब टकले, हनुमान तार्डे, नारायण टकले, हनुमान तार्डे, राहुल गुंजाळ, विजय टकले, सुखदेव पाटील, कल्याण टकले, राम पाटील, लक्ष्मण टकले, रंजित जाधव, तुळजीराम पांढरे, पिराजी ढोले, गंगाधर पाटील यांनी सहकार्य केले.