परंडा : परंडा पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी कल्पना दळवी यांनी मंगळवारी दुपारी राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरु असून, रात्री उशिरापर्यत त्यांनी विषारी द्रव का पिले याची माहिती मिळू शकली नाही़ या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, येथील पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या कल्पना तुकाराम दळवी (वय २८) यांनी मंगळवारी दुपारी घरात विषारी द्रव पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजारी राहणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दळवी यांना दुपारी १़२० वाजता उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले़ त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़ याबाबत परंडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पारवे पाटील हे करीत आहेत. दळवी यांच्यावर उपचार सुरू असल्याने त्यांचा जवाब नोंदवण्यात आला नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी दळवी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली. (वार्ताहर) दळवी यांची प्रकृती धोक्याबाहेरमहिला पोलिस कर्मचारी दळवी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात ह्दयगती, रक्ताचे आॅक्सिजनमधील प्रमाण व रक्तदाब यावर नियंत्रण राहवे या अनुषंगाने कार्डीयाक मॉनिटरद्वारे उपचार सुरु केले. सद्यस्थितीत संबंधित महिला पोलीस कर्मचारी दळवी यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ संजय वाळके यांनी सांगितले़
महिला पोलिसाने केले विष प्राशन
By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST