औरंगाबाद : ‘करवीर पीठाचा शंकराचार्य म्हणून माझी इच्छा आहे की, अयोध्येमध्ये त्याच जागी राम मंदिर बनावे व तेही याच सरकारच्या कार्यकाळात. मात्र असे म्हणतात की, महिलांच्या मनात काय चालले हे कळत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काय चालले याचाही थांगपत्ता लागत नाही, ते कधी काय निर्णय घेतील याचा नेम नाही,’ असे विचार करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंहभारती स्वामी यांनी येथे व्यक्त केले. दत्त जयंतीनिमित्त सिडको एन- ७ येथील जागृत दत्तमंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी शंकराचार्य शहरात आले होते. या निमित्ताने आयोजित (पान १ वरून) पत्रपरिषदेत शंकराचार्य यांनी सांगितले की, माझा राजकारणाशी काही संबंध नाही; पण धर्मपीठाच्या गादीवर बसलो असताना मलाही सर्वांप्रमाणे राम मंदिर उभारले जावे असेच वाटते. ‘शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी विधानसभेसमोर महिला आमदारांनी निदर्शने केली. याबद्दल शंकराचार्य म्हणाले की, हिंदू संस्कृतीत काही रुढी, परंपरा आहेत. त्या आज तयार झालेल्या नाहीत, तर हजारो वर्षांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या आहेत. यामुळे रुढी, परंपरांचे ‘गुडविल’ जपले गेले पाहिजे. मात्र, काळाच्या ओघात आलेल्या शास्त्रविरोधी परंपरा मोडीत काढायला हव्यात. जसे की, सतीची प्रथा आता बंद झाली आहे. चौकट वेळप्रसंगी असहिष्णू बनावे शंकराचार्य म्हणाले की, कोणी कसे राहावे, कसे वागावे, हे धर्म संस्कृतीने ठरवून दिले आहे. सैनिकांनी सहिष्णू राहून चालत नाही. त्यांनी असहिष्णूच राहिले पाहिजे. तसेच बुद्धिजीवींनी सहिष्णूच राहिले पाहिजे. मात्र, क्वचितप्रसंगी असहिष्णूही बनले पाहिजे.
स्त्रियांप्रमाणेच मोदींच्याही मनाचा ठाव लागणे कठीण
By admin | Updated: December 18, 2015 23:47 IST