विमल लक्ष्मण कजबे (२८, रा. सारा वैभव, सिडको वाळूज महानगर) ही महिला शनिवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र ती अद्यापपर्यंत घरी न परतल्याने तिचा पती लक्ष्मण कजबे यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
फोटो-विमल कजबे
--------------------------
पाटोदा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
वाळूज महानगर : पाटोदा येथील सखाराम पा. पेरे चौक ते पाटोदा गाव या रस्त्यावर वाहनाच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट उडत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना आदळआपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील साईड पंखेही गायब झाले आहेत.
-------------------------------
अविनाश कॉलनीत भुरटे चोरटे सक्रिय
वाळूज महानगर : वाळूजच्या अविनाश कॉलनी-शिवाजीनगर परिसरात भुरटे चोरटे सक्रिय झाले असून घरासमोरील वस्तू चोरटे लांबवित आहेत. रात्रीच्यावेळी चोरटे दुचाकी व चारचाकी वाहनातील इंधनाची चोरी करतात. या शिवाय घराच्या समोरील साहित्यही चोरटे लांबवित असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
---------------------------
पंढरपुरात दुभाजकावर कचरा
वाळूज महानगर : पंढरपुरातील रस्ता दुभाजकावर केर-कचरा टाकला जात असल्याने रस्त्यावर अस्वच्छता पसरत आहे. गावातून गेलेल्या महामार्गावरील दुभाजकावर भाजी विक्रेते व इतर व्यावसायिक केर-कचरा आणून टाकतात. या केर-कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे व जनावरांचा दुभाजकावर वावर वाढला असून अपघाताचा धोका बळावला आहे.
--------------------------------