शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी सातेफळात महिलांचा जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:35 IST

टेंभुर्णी : एखाद्या समस्येला वैतागलेल्या महिलांनी रुद्रावतार धारण केला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावाला सोमवारी आला.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : एखाद्या समस्येला वैतागलेल्या महिलांनी रुद्रावतार धारण केला तर काय होऊ शकते याचा प्रत्यय जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावाला सोमवारी आला. गावात महिलांनी दारूबंदीसाठी पोलीस व ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता गस्ती पथकाची स्थापना केली आहे. महिलांचे हे गस्ती पथक आता दारूबंदीसाठी रात्रंदिवस जागता पहारा देताना दिसत आहे.सातेफळ गावात अवैध दारू विक्री होत असल्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन बनले आहेत. दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. ग्रामपंचायत व पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही दारूबंदी होत नसल्याने आता तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा सवीता माळी यांनीे गावातील महिलांना सोबत घेऊन दारूबंदी विरुद्ध थेट एल्गार पुकारण्यासाठी गस्त पथकाची स्थापना केली आहे. या महिला गटागटाने रात्री व दिवसा पथकात सहभाग घेत आहेत. पथकातील महिलांनी गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यास सुरुवात केल्याने तळीरामांची महिला पथकास पाहतात भागंभाग पाहायला मिळत आहे. परिणामी गावात दारू विक्री बंद झाली आहे. महिलांनी घेतलेल्या या पुढाकाराचे ग्र्रामस्थांकडून कौतुक होत आहे.महिलांच्या या गस्त पथकात ममताबाई काळे, सुमनबाई हरणे, शोभा घाडगे , कांताबाई जाधव, सुमनबाई निकाळजे, शांताबाई खंदारे, पुंजाबाई खंदारे, अंजनाबाई जटाळे, गयाबाई साळुंखे, पुष्पा मुळे, मंदाबाई बनकर, राधाबाई ससाणे, पद्माबाई तांबे, मीराबाई माळी, नंदाबाई फुलमाळी, पुरणाबाई निकाळजे, रुख्मणबाई सोनुने, कवसाबाई जटाळे , फुलाबाई खंदारे यांचा समावेश आहे. महिलांनी दारूबंदीसाठी घेतलेल्या या पुढाकारामुळे गावात अनेकांचे संसार पुन्हा फुलू लागल्याने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.