पालम : शहरातील महिलेला मासे घेण्याच्या कारणावरून दोन जणांनी मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून महिलेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३ आॅगस्ट रोजी घडली आहे. पालम पोलिस ठाण्यात दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठ पिंपळगाव रस्त्यावर मासे खरेदी करण्यासाठी फुलाबाई मयपती पवार (वय ५५) या ३ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाजारात गेल्या होत्या. मासे घेण्याच्या कारणावरून दोन जणांनी या महिलेस मारहाण केली होती. हा राग मनात धरून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फुलाबाई पवार यांनी कीटनाशक प्राशन केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पालम पोलिस ठाण्यात भगवान मयपती पवार यांच्या फिर्यादीवरून दोन जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास पालम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पालम पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक भाकरे हे करीत आहेत.(प्रतिनिधी)
कीटकनाशक प्राशन करून महिलेची आत्महत्या
By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST