शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

महिलेचा पतीच निघाला खूनी

By admin | Updated: February 18, 2015 00:42 IST

वाशी : तालुक्यातील कन्हेरी जवळील डोंगरपायथ्याशी बारा दिवसांपूर्वी एका ४० वर्षीय महिलेचा खून करून प्रेत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता़

वाशी : तालुक्यातील कन्हेरी जवळील डोंगरपायथ्याशी बारा दिवसांपूर्वी एका ४० वर्षीय महिलेचा खून करून प्रेत फेकल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, सदरील महिलेचा खून हा तिच्या पतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने तशी कबुलीही दिल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, लग्नाला महिन्याचा कालावधी लोटण्यापूर्वीच हा खुनाचा प्रकार घडला आहे.हाडोंग्री रस्त्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील लालबावटा डोंगर पायथ्याला निर्जनस्थळी एका ४० वर्षीय अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह ५ फेब्रुवारी रोजी गुराख्यांना आढळला होता. सदरील घटना त्याने सायंकाळी पोलीस पाटीलांना सांगितली़ पोलीस पाटलांनी ६ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्याला माहिती दिली़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शहाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसिंंग चव्हाण यांनी डोंगरपायथ्याशी जाऊन पाहणी केली़ छिन्न-विछिन्न अवस्थेत अज्ञात महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता़ मृतदेहा शेजारी एक मफ लर व रक्ताने माखलेला दगड आढळून आला होता़ त्यावरून सदरील महिलेचा खून झाल्याचा कयास पोलिसांनी लावीत, खूनाचा गुन्हा दाखल केला होता़ तपासादरम्यान हा खून संजय जगन्नाथ वाघमारे (४५ रा.जांब बावी, ता.भूम ह.मु.नवी मुंबई (वाशी)) याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून त्याला जेरबंद केले़ त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मुंबईत गवंडी, रंगारी काम करीत असताना दूर नात्यातीलच बीड येथील विवाहित असलेल्या कमल नामक महिलेशी २० जानेवारी रोजी भोनगिरी (ता़भूम) विवाह केला होता़ विवाहानंतर पत्नी कमल ही नात्यातील कोणासही बोलल्यानंतर संशयाने पाहून भांडणे करीत होती़ ‘कोणास बोलला तर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेईन, तु मला जाळून मारलेस’ अशी तक्रार देण्याची धमकीही देत होती़ लग्नाला एक महिना लोटण्यापूर्वीच पत्नी अशी वागू लागल्यानंतर ती नीट जगू देणार नसल्याचे मनात आल्याने तिचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेत, तिला कन्हेरी (ता.वाशी) येथे जाऊ म्हणून २ फ ेब्रुवारीस तिला गोड बोलून कन्हेरीकडे आणले़ मात्र, वाटेत आल्यावर ‘मला तुझ्या नातेवाईकाकडे जायचे नाही’ म्हणून भांडणास सुरूवात केली़ तिला गोड बोलून लालबावटा नावाच्या डोंगरपायथ्याजवळ नेहून तिचा मफलरने गळा आवळून खून केल्याची कबुली संजय जगन्नाथ वाघमारे याने पोलिसांना दिली आहे़ (वार्ताहर)मयत महिला ही बीड येथील रहिवाशी असल्याचे समजते़ या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोना उपकेंद्र कुलकर्णी यांना प्रथत: सुगावा लागला होता़ प्रकरणाचा उलगडा करण्याकामी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनीही प्रशासनाला सहकार्य केल्याचे समजते़ पोनि शहाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्याना दहा दिवसात प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आले. दरम्यान, संजय जगन्नाथ वाघमारे याने आपल्या नातेवाईकांच्या मध्यस्थीने बीड येथील कमल नामक महिलेशी विवाह केला होता़