हट्टा : खोकल्याचे औषध समजून विषारी द्रव्य पिल्याने महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी हट्टा पोलिसांत नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील सोन्ना येथील वनिता प्रल्हादराव जाधव यांना खोकल्याचा त्रास असल्याने त्यांनी १५ डिसेंबर रोजी घरातील पाटीवर ठेवलेले औषध खोकल्याचे आहे, असे समजून पिले. परंतु ते द्रव्य विषारी असल्याने वनिताला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वनीताचा अखेर मृत्यू झाला. याप्रकरणी रामराव भीमराव जाधव यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून हट्टा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार अनिल सिरसाठ करीत आहेत. (वार्ताहर)
विषप्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
By admin | Updated: December 24, 2015 23:59 IST