शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाला लुटणा-या महिलेस रंगेहात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 14:52 IST

एका ९३ वर्षीय वृद्धाला तोंड ओळख झालेल्या महिलेने तुम्हाला पाहुण्यांचे शेत दाखवते अशी थाप मारत पैठण रोडवरील एका मंदीरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत लुटले.

ऑनलाईन लोकमत

औरंगाबाद: एका ९३ वर्षीय वृद्धाला तोंड ओळख झालेल्या महिलेने तुम्हाला पाहुण्यांचे शेत दाखवते अशी थाप मारत पैठण रोडवरील एका मंदीरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत लुटले. यावेळी नागरिकांनी प्रसंगवधान दाखवत दयाबाई सुरेश मगरे या  महिलेस पकडले व तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.

याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, सांडू सिरसाठ हे ९३ वर्षीय वृद्ध सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादेतील रहिवासी आहेत. सध्या ते हडको एन-११ येथे  नातेवाईकाकडे राहतात. रविवारी (दि.२३) सकाळी १० च्या दरम्यान ते  सुदर्शननगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात फिरायला गेले. तेथे दयाबाई मगरे त्यांच्याशी साधेपणाने गप्पामारू लागल्या, नातीच्या वयाची महिला असल्याने सिरसाठ हे तिच्याशी बोले. यावेळी मगरे यांनी त्यांना चहा पिण्यासाठी तिच्या घरी रिक्षातून नेले. तेथे  तुम्हाला माझ्या मुलीचे शेत दाखविते आणि पाहुण्यांना भेटून येऊ, असे म्हणत तिने सिरसाठ यांना रिक्षातून पैठणरोडकडे आणले.
 
लक्ष्मी मंदीराच्या जवळ रिक्षा थांबवत ति सिरसाठ यांना मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन आली. आजूबाजूचा कानोसा घेत दयाबाई ने सिरसाठ यांना हातातील अंगठ्या व  कानातील सोन्याच्या बाळा काढून दे नाहीतर फेट्याने तुझा गळा आवळून जीवे मारीन अशी धमकी दिली. यावेळी सिरसाठ यांनी यास नकार देताच  दयाबाईने त्यांना मारहाण करीत बळजबरीने बोटातील अंगठी काढून घेतली आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबडू लागली. 
 
अचानक ओढवलेल्या या प्रसंगाने घाबरून जात सिरसाठ यांनी आरडाओरड केली, यावर दयाबाई त्यांना धक्का देत पळाली. मात्र ; सिरसाठ यांच्या आरडाओरड्याने लोक जमले व त्यांनी लागलीच दयाबाईला पकडले. याच दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ही घटना सिडको ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सिडको पोलिसांनी तिला  तिला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी दिली.