औरंगाबाद : दुपारचे बारा वाजेलेले... एक जण जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. ‘साहेब मी बायकोचा गळा दाबून खून केला. चला बघा अन् मला अटक करा...’ त्याच्याकडे पाहून पोलिसांना विश्वासच बसेना कारण चेहऱ्यावर ना भीती होती, ना पश्चातापाचे हावभाव... तरीही खातरजमा करण्यासाठी पोलीस त्याच्यासोबत घरी गेले, तेव्हा खरोखरच घरात त्याच्या पत्नीचे प्रेत पडलेले आढळून आले. चारित्र्यावरील संशयावरून आपण पत्नीचा काटा काढल्याची कबुली या आरोपीने दिली. गारखेडा परिसरातील काबरानगरात आज दुपारी ही घटना घडली. शबनम सगीर खान (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा खून करणारा पती सगीर ऊर्फ समीर सदाउल्ला खान (३५) याला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली.