शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दरड कोसळल्याने आडगावात महिला ठार

By admin | Updated: April 7, 2016 01:04 IST

औरंगाबाद : क्रशरसाठी खदानीतून काढलेले दगड ट्रॅक्टरमध्ये भरताना तब्बल १०० फूट उंचावरून कोसळलेली दरड अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद : क्रशरसाठी खदानीतून काढलेले दगड ट्रॅक्टरमध्ये भरताना तब्बल १०० फूट उंचावरून कोसळलेली दरड अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आडगाव चिंचोली (ता. औरंगाबाद) येथे घडली. या घटनेत मृत महिलेचा पती आणि तीनवर्षीय मुलगाही गंभीर जखमी झाला आहे. भाग्यश्री रमेश देवकर (२५, ह. मु. आडगाव चिंचोली, रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे मयत महिलेचे नाव आहे. रमेश पांडुरंग देवकर आणि आरुष रमेश देवकर हे बाप-लेक जखमी आहेत. त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील बिबी येथील रमेश देवकर यांची पत्नी भाग्यश्री व तीन वर्षीय मुलगा आरुष हे मागील पंधरा दिवसांपासून आडगाव चिंचोली येथे राहतात. ते येथील खदानीत काम करून पोट भरत आहेत. १५ ते २० मजूर येथे काम करतात. क्रशरसाठी दगड काढण्याचे काम या खदानीत चालते. गुत्तेदार ब्रह्मदेव बोंगाने यांच्यामार्फत हे काम सुरू होते, असे नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी दुपारी २ वाजता नेहमीप्रमाणे दगड काढून ते ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम करीत असताना अंदाजे १०० फूट उंचावरून दरड कोसळली. यातील एक दगड भाग्यश्रीच्या अंगावर पडला. यामुळे तिचे डोके फुटले आणि डाव्या हाताला व पायाला गंभीर मार लागला. प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला उपचारार्थ औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भाग्यश्रीचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सिडको पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दरम्यान, उडालेला दगड रमेश व आरुष यांच्याही डोक्यास लागला होता. त्यांनाही गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर एमजीएममध्ये उपचार करण्यात आले. आरुषच्या डोक्याला टाके पडले आहेत. सिडको ठाण्यात नोंद करून हे प्रकरण चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे सिडको पोलिसांनी सांगितले.