शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शेतीच्‍या वादातून चाकूने वार करून दोघांचा खून केल्याच्या गुन्‍ह्यात आरोपी सुरेखा पवार हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन ...

औरंगाबाद : शेतीच्‍या वादातून चाकूने वार करून दोघांचा खून केल्याच्या गुन्‍ह्यात आरोपी सुरेखा पवार हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मंजूर केला. सुरेखाला अटक झाल्यास २५ हजाराच्‍या जातमुचलक्यावर तिची जामिनावर सुटका करावी, असे आदेशात म्हटले आहे.

यासंदर्भात लताबाई पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा आणि विष्‍णू मुरचंद पवार यांचा शेतीवरून वाद सुरू होता. १३ एप्रिल रोजी शेतीच्‍या वादातून दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली होती. त्‍यानंतर फिर्यादीचे कुटुंब गावाकडे निघाले असता, रात्री साडेदहा वाजता कारकीन फाट्याजवळ आरोपीने फिर्यादीच्‍या वाहनाला दुचाकी अडवी लावली. फिर्यादीचा पुतण्‍या संकेत, फिर्यादीचा भाचा ज्ञानेश्‍वर आणि ज्ञानेश्‍वरची पत्‍नी हिराबाई यांच्‍यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान संकेत आणि ज्ञानेश्‍वर यांचा मृत्‍यू झाला. त्यावरून विष्‍णू पवारविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. गुन्‍हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, गुन्‍ह्यात आरोपी विष्णू पवार याची पत्नी सुरेखा पवार हिचासुद्धा सहभाग असल्याचे नमूद केले.

या गुन्‍ह्यात सुरेखा पवार हिने अटक टाळण्यासाठी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्‍यायालयाने फेटाळून लावला. याविरोधात सुरेखा पवार हिने ॲड. चैतन्‍य देशपांडे यांच्‍यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. सुनावणीअंती न्‍यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात ॲड. देशपांडे यांना ॲड. अविनाश बांगर यांनी सहकार्य केले.

---------------------------------------------------------