शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत महिलेने दिला एजंटला चोप

By admin | Updated: July 20, 2016 00:31 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटशिवाय कोणतीही कामे सहज होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. तात्काळ काम होण्याच्या आशेने वाहनधारक एजंटचा रस्ता धरतात.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटशिवाय कोणतीही कामे सहज होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. तात्काळ काम होण्याच्या आशेने वाहनधारक एजंटचा रस्ता धरतात. मात्र, छोट्या-छोट्या कामांसाठी एजंटकडून आर्थिक पिळवणूक आणि मनमानी कारभार होतो. याची तक्रार करण्याकडे बहुतांश वाहनधारक दुर्लक्ष करतात; परंतु पैसे घेऊनही लायसन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एजंटला कार्यालयाच्या आवारातच चोप देत एका महिलेने मंगळवारी चांगलीच अद्दल घडविली.आरटीओ कार्यालयात विविध कामे एजंटशिवाय करणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे लर्निंग, पर्मनंट लायसन्स, परवाना नूतनीकरण, अशी विविध कामे स्वत:च करणारे सर्वसामान्य नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकतच राहतात. एजंटशिवाय कामे करणाऱ्यांची काही जणांकडून मुद्दाम दिशाभूल केली जाते. त्यामुळे नाइलाजाने वाहनधारकांना एजंट गाठावाच लागतो.आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंटांनी बस्तान मांडले आहे. तात्काळ काम करून देण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. अवघ्या काही रकमेत होणाऱ्या कामांसाठी वाहनधारकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. परंतु महिनोन्महिने वाहनधारकांना त्या कामासाठी नुसती प्रतीक्षा करावी लागते. एवढे सर्व होऊनही वाहनधारकांकडून तक्रार करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे कार्यालयात एजंटगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे.आरटीओ कार्यालयात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मात्र, वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पैसे घेऊनही लायसन्स देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका एजंटला संतप्त महिलेचा दुर्गावतार पाहावा लागला. अनेक दिवस उलटूनही लायसन्स मिळत नसल्याने पैसे परत करण्याची मागणी महिलेने केली. एजंट टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच महिलेने मग त्यास चांगलाच चोप दिला. यावेळी वाहनधारक आणि एजंटांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण झाले. ही महिला आपली तक्रार घेऊन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्याकडे गेली. कार्यालयात कोणतेही अधिकृत एजंट नसून याविषयी पोलिसांत तक्रार देण्याची सूचना त्यांनी केली.काही जणांवर बंदीया एजंटने यापूर्वीही पैसे घेऊन अनेकांचे काम करण्याचे टाळले आहे. त्याच्याकडून वाहनधारकांची फसवणूक होते, हे अन्य एजंटांना माहीत आहे. तरीही त्याच्याकडे जाणाऱ्या वाहनधारकांना याची कल्पना दिली जात नाही. काही दिवसांपूर्वीच आठ एजंटांविरुद्ध कारवाई करून आरटीओ कार्यालयाच्या आवारात येण्यास बंदी घालण्यात आली.