शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:25 IST

पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील १९ वर्षीय तरुणीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तिने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती गावक-यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील १९ वर्षीय तरुणीने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तिने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती गावक-यांनी दिली.राजश्री काकासाहेब सातपुते असे मयत तरुणीचे नाव आहे. सकाळी तिने विष प्राशन केल्याचे लक्षात येताच तिचा भाऊ व आई -वडिलांनी तिला तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.वैद्यकीय अधिकाºयांनी उपचार करून पुढील उपचारासाठी तिला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरु असताना सायंकाळी राजश्रीचा मृत्यू झाला.जमादार तडवी यांनी पाचोड पोलिसांना माहिती दिली. पाचोडचे सपोनि. महेश आंधळे व जमादार मते यांनी घाटी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. पाचोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.सोमवारी सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात राजश्रीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. शासनाने या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी अनिल हजारे, परासराम हजारे, भागवत हजारे, संदीप हजारे, पांडुरंग हजारे यांनी केली आहे.राजश्रीच्या वडीलांकडे जेमतेम शेती असून त्यात सोसायटी व बँकेचे कर्जही डोक्यावर आहे. गेल्या वर्षी शेतीतही उत्पन्न झाले नव्हते.यंदा कपाशी चांगली आली पण बोंडअळीने त्यावर हल्ला केल्याने मोठे नुकसान झाले, असे दादेगाव येथील ग्रामस्थ म्हणाले.