शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:11 IST

विवाहितेच्या संमतीविना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून आपतभालगाव येथे अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या नर्सला अटक केली. महिलेच्या या गर्भपात केंद्रात औषधीचा साठा आणि काही कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विवाहितेच्या संमतीविना तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून आपतभालगाव येथे अनधिकृत गर्भपात केंद्र चालविणा-या नर्सला अटक केली. महिलेच्या या गर्भपात केंद्रात औषधीचा साठा आणि काही कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली.ललिता रमेश मून ऊर्फ खाडे (४०, रा. आपतभालगाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज म्हणाले की, पुंडलिकनगर येथील रहिवासी अर्चना सुनील वाघ यांनी दिलेल्या तक्रारीत लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी तिला चांगली वागणूक दिली. तिला एक मुलगी असून, नंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी तिला दुसरी मुलगीच होईल असे म्हणून तिचा छळ सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी तिच्या इच्छेविरोधात गतवर्षी आपतभालगाव येथे गर्भपात केला. माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी सासरी होणाºया छळाला कंटाळून आणि इच्छेविरोधात गर्भपात केल्याची तक्रार तिने पुंडलिकनगर ठाण्यात नोंदविली होती. यावरून आरोपी सुनील वाघ, शिवाजी वाघ, कमलबाई वाघ, अनिल वाघ, नणंद सविता, नंदई बापू डिघोळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड यांच्या पथकाने आपतभालगाव येथे जाऊन गर्भपात करणाºया महिलेला शोधून काढले. तेव्हा ती तेथे अनधिकृत गर्भपात केंद्रच चालवीत असल्याचे त्यांना आढळले. तेथे औषधीचा मोठा साठाही पोलिसांना मिळाला. ती नर्स काही वर्षे एका रुग्णालयात कार्यरत होती. नंतर तिने नोकरी सोडून देऊन चोरट्या मार्गाने गर्भपात करणे, प्रसूती करण्याची कामे सुरू केली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाºयांना सोबत घेऊन तिच्या दोन मजली घरावर धाड मारली, तेव्हा तेथील दोन खोल्यांमध्ये तिने अनधिकृत गर्भपात केंद्र उघडल्याचे दिसून आले. तेथे पोलिसांना गर्भपाताच्या गोळ्या आणि औषधीचा साठा आणि काही कागदपत्रे, रक्ताने माखलेले कपडे, गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे मिळाली. या दोन्ही खोल्या वैद्यकीय अधिकाºयांसमोर सील करण्यात आल्या. औषधी डॉक्टरांनी जप्त केली. या महिलेने आतापर्यंत किती महिलांचे अनधिकृत गर्भपात केले, याबाबतचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अशोक आव्हाड, गणेश डोईफोडे, महिला पोलीस गायकवाड, एसपीओ संतोष बोदक, शिवाजी गुट्टे यांनी केली.