शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गोदामांविना करोडोंच्या धान्याची नासाडी...!

By admin | Updated: June 27, 2016 01:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात दरवर्षी अंदाजे ७५ कोटी रुपयांच्या धान्याची नासाडी गोदामांअभावी होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी विभागीय पातळीवर गोदामांची बांधकामे पूर्ण करावीत

औरंगाबाद : मराठवाड्यात दरवर्षी अंदाजे ७५ कोटी रुपयांच्या धान्याची नासाडी गोदामांअभावी होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी विभागीय पातळीवर गोदामांची बांधकामे पूर्ण करावीत अथवा बीओटीवर गोदामे बांधणे किंवा बांधकाम विभागाच्या भाडे निकषावर गोदामे करारावर घेण्याचा विचार अन्न व नागरी पुरवठा विभाग करीत आहे. त्याप्रकरणी येत्या काही महिन्यांत निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गंगापूर येथील गोदामाला भेट दिल्यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे मराठवाड्यात गोदामांची संख्या, ठप्प झालेली बांधकामे आणि होत असलेली धान्याची नासाडी, याचा पूर्ण आढावा घेतला. त्यानंतर विभागातील धान्याचा गोदामांअभावी होणाऱ्या नुकसानीचा डोके चक्रावून टाकणारा आकडा समोर आला. सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ पातळीवर गोदामांची संख्या आणि धान्य साठवणूक व नासाडी याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे अन्नसुरक्षा योजना राबविण्यात आली. एपीएल, बीपीएलसह उर्वरित दुष्काळग्रस्तांनादेखील या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न शासनाने केला. यामध्ये विदर्भातील ६ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांना वेळेत धान्य देण्यासाठी त्याचा साठा करण्यासाठी लागणाऱ्या गोदामांची संख्या कमी आहे. त्यामुळे बहुतांश धान्य उघड्यावर ठेवावे लागते. धान्य चोरी अथवा अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याच्या घटना घडत असल्यामुळे भाडेकरारावर गोदाम घेण्याच्या प्रस्तावावर शासन विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.