शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

महोत्सव जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:03 IST

चित्रपट पाहिल्याने सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होते. सिनेमासारखे सर्वांत सुंदर काही नाही. त्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’ आहे. सिनेमा कसा पाहावा याची नवदृष्टी या महोत्सवातून मिळते, अशा शब्दात चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक व महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी चित्रपट महोत्सवाचे वर्णन केले. पुढील वर्षी महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल, अशी त्यांनी घोषणा करताच उपस्थित सर्व सिनेरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना तेवढाच जोरदार पाठिंबा दिला.

ठळक मुद्देपर्वणी : औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चित्रपट पाहिल्याने सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होते. सिनेमासारखे सर्वांत सुंदर काही नाही. त्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे जगाकडे पाहण्याची ‘खिडकी’ आहे. सिनेमा कसा पाहावा याची नवदृष्टी या महोत्सवातून मिळते, अशा शब्दात चित्रपट समीक्षक, दिग्दर्शक व महोत्सवाचे संचालक अशोक राणे यांनी चित्रपट महोत्सवाचे वर्णन केले. पुढील वर्षी महोत्सव आणखी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल, अशी त्यांनी घोषणा करताच उपस्थित सर्व सिनेरसिकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना तेवढाच जोरदार पाठिंबा दिला.प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटर येथे गुरुवारी सायंकाळी अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, स्मिता तांबे, अभिनेते उपेंद्र लिमये, महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबादवर मी खूप प्रेम करतो असे म्हणत महेश मांजरेकर यांनी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली. औरंगाबादमुळे मी घडलो, असे सांगताना त्यांनी लेखक अजित दळवी व दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा उल्लेख केला. तीन दिवस देशी व विदेशी भाषांतील विविध चित्रपटांचा आनंद लुटा असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. चित्रपट महोत्सवासाठी यंदा औरंगाबादकरांनी पुढाकार घेतला याचे कौतुक मृणाल कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी, प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यांनी केले. सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, ज्युरी समितीचे अध्यक्ष विकास देसाई, प्रा. एमी कॅटलीन, समीक्षक सैबल चॅटर्जी, प्रा. अजित दळवी, सुजाता कांगो आदींची उपस्थिती होती. महोत्सव यशस्वितेसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नीलेश राऊत व सहकारी परिश्रम घेत आहेत.२८ चित्रपटांची मेजवानीऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशी-विदेशी भाषांतील २८ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यात ३ मराठी भाषेतील असून अन्य ६ विविध भाषांतील चित्रपट असणार आहेत. उद्घाटनानंतर मनोज वाजपेयी अभिनित व अतुन मुखर्जी दिग्दर्शित ‘रुख’ चित्रपट दाखविण्यात आला.