शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

कुलगुरुपदी भूमिपुत्रच हवा; विद्यापीठ वर्तुळात सूर

By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी भूमिपुत्राची निवड झाली पाहिजे, अशी या पदासाठीच्या शर्यतीतील उमेदवारांची इच्छा आहे.

 बापू सोळुंके , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी भूमिपुत्राची निवड झाली पाहिजे, अशी या पदासाठीच्या शर्यतीतील उमेदवारांची इच्छा आहे. २९ जण या पदासाठी इच्छुक असून, अशी मागणी अद्याप तरी कोणी थेटपणे केलेली नाही; परंतु हा मुद्दा गती घेत आहे. शिवाय विद्यापीठावर वर्चस्व गाजविणार्‍या राजकीय यंत्रणेलाही कुलगुरू मराठवाड्यातीलच हवा, असे वाटते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी २९ आणि ३० मे रोजी मुंबई विद्यापीठात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. २९ उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. डॉ. बा.आं.म. विद्यापीठातील प्रा. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. व्ही.बी. भिसे, डॉ. बी.एस. वाघमारे, डॉ. वाय.के. खिल्लारे, डॉ. एम.बी. मुळे आणि विद्यापीठाच्या उस्मानाबाद केंद्रातील डॉ. ए.एम. देशमुख यांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर मराठवाड्यातील भूमिपुत्राची वर्णी लागावी, असा मुद्दा महिनाभरापासून चर्चिला जात आहे. याविषयी अद्याप एकाही संघटनेने राज्यपाल अथवा शासनाकडे अधिकृत निवेदन पाठविले नाही. मात्र, तशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक कुलगुरू झाल्यास त्यास विद्यापीठ कार्यक्षेत्राची भौगोलिक आणि शैक्षणिक माहिती असते. विद्यापीठातील विविध प्रश्नांची जाण असल्याने कोणता प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचा आहे, याबाबत ते अधिक जागरूक असतात. प्रशासनाची तंतोतंत माहिती असल्याने ते प्रशासनही उत्कृष्टपणे सांभाळू शकतात. अशा वेळी भूमिपुत्र कुलगुरू मिळाल्यास शैक्षणिक आणि प्रशासकीयदृष्ट्या हिताचे ठरेल, अशी चर्चा होऊ लागली आहे. आतापर्यंतचे १४ कुलगुरू, त्यात ७ मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला १४ नियमित कुलगुरू होऊन गेले आहेत. यात प्राचार्य आर.पी. नाथ, प्राचार्य गो.रा. म्हैसेकर, डॉ. भगतसिंह राजूरकर, डॉ. विठ्ठलराव घुगे, डॉ. एस.बी. नाकाडे, के.पी. सोनवणे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे कुलगुरू मराठवाड्याचे भूमिपुत्र होते. यातील काही जणांचा कार्यकाळ वादग्रस्त तर काहींचा चांगला राहिला आहे. डॉ. आर.पी. नाथ १९७१ ते १९७५ या कालावधीत कुलगुरू होते. उत्तम प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठातील विविध विभागांचा उत्क र्ष झाला. डॉ. भगतसिंह राजूरकर हे १ नोव्हेंबर १९८५ ते ६ मार्च १९८८ यादरम्यान कुलगुरू होते. त्यांच्या क ार्यकाळात विद्यापीठाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी १६ सप्टेंबर १९९१ ते १६ सप्टेंबर १९९४ या कालावधीत विद्यापीठाचा कारभार पाहिला. या कालावधीतच विद्यापीठ नामविस्तार झाला. धडाकेबाज निर्णय घेणारा उत्तम प्रशासक, अशी त्यांची ओळख होती. त्यावेळी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण झाले. त्यांच्या विरोधात राज्यपाल कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. डॉ. एस.बी. नाकाडे हे ४ नोव्हेंबर १९९४ ते ३ नोव्हेंबर १९९९ यादरम्यान कुलगुरू होते. संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले नाकाडे यांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत निर्णय घेतले. बर्‍याचदा व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचाही त्यांनी विरोध पत्करला. प्राचार्य गो.रा. म्हैसेकर यांनी ८ जुलै १९८२ ते १६ सप्टेंबर १९८३ या कालावधीत मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून उत्कृष्ट काम केले. शिस्तप्रिय कुलगुरू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. प्राचार्य गो.रा. म्हैसेकर कुलगुरू सोनवणे यांनी २९ डिसेंबर १९९९ ते २० डिसेंबर २००४ या कालावधीत विद्यापीठाचा कारभार सांभाळला. तेव्हा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण झाले. त्यामुळे नाराज झालेल्या सोनवणे यांनी दोन वेळा कुलगुरुपदाचा राजीनामाही देऊ केला होता. हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी त्यांनी विद्यापीठात ध्वजारोहण न केल्याने विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थी संघटनांना माफीनामा लिहून दिला होता. दरवर्षी पाच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. के.पी. सोनवणे डॉ. कोत्तापल्ले जून २००५ ते ४ जून २०१० या कालावधीत कुलगुरू होते. त्या काळात त्यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप झाला होता. विविध विद्यार्थी संघटनांची एकाधिकारशाही त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे संघटना त्यांच्या विरोधात होत्या. मात्र, त्यांनी कधीही विद्यार्थ्यांच्या विरोधात निर्णय घेतला नाही. उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळावी यासाठी विद्यार्थी संघटनांनी मोठा मोर्चा काढला होता. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले