शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण ताकतीनिशी भाजपा मनपाची निवडणूक लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:31 IST

आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: आगामी महापालिका निवडणूक भाजपा संपूर्ण ताकतीनिशी लढणार असल्याची माहिती भाजपाचे महानगराध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र व राज्यातील सरकारच्या पादर्शक कारभारावर जनता विश्वास ठेऊन भाजपला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्यातील पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, सोलापूर, लातूर, मुंबई, औरंगाबाद या महापालिका भाजपाच्या ताब्यात आहेत. नुकत्याच झालेल्या मीरा भार्इंदरच्या निवडणुकीतही भाजपाला एकहाती सत्ता मिळाली आहे. या पार्श्वभूमिवर नांदेडमध्येही मोठे परिवर्तन होईल. त्यामुळे काँग्रेसचे ५, सेनेचे ४, राष्टÑवादीचे २, सेनेचे जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख यांनी भाजपात प्रवेश घेतला. आगामी काळातही विविध पक्षांचे नगरसेवक, नेते भाजपात प्रवेश करतील, असे हंबर्डे यांनी सांगितले. शहरातील अस्वच्छता, दलितवस्तीची कामे, बीएसयुपीची कामे अर्धवट आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले असल्याचे हंबर्डे म्हणाले़ यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अ‍ॅड. चैतन्य देशमुख यांनी नांदेडमध्ये लातूर, मीरा भार्इंदरची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहरासाठी करोडो रुपयांचा निधी आला तरी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची टीका केली़ यावेळी माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, संजय कौडगे, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख, विनोद पावडे, दिलीपसिंघ सोढी, विनय गुर्रम, बाळू खोमणे, दीपकसिंह रावत, बंडू पावडे, अभिषेक सौदे, नवल पोकर्णा, किशोर यादव, शीतल खांडील आदींची उपस्थिती होती.