शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाच्या योग्य पद्धतीने होईल,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : नेहमी मोठी स्वप्ने बघा. समाजाचे व देशाचे आपण काही देणे लागतो, हे लक्षात ठेवून करिअरची निवड ...

औरंगाबाद : नेहमी मोठी स्वप्ने बघा. समाजाचे व देशाचे आपण काही देणे लागतो, हे लक्षात ठेवून करिअरची निवड करा. सर्वच क्षेत्रात अटीतटीची स्पर्धा आहे, पण तेवढ्याच संधीही आहेत. त्यामुळे शालेय जीवनापासूनच अभ्यासासाठी योग्य, तसेच स्पर्धात्मक पद्धत निवडली तर नक्कीच करिअर आणि जीवनात यशस्वी व्हाल, असा विश्वास ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक गोविंद काबरा यांनी विद्यार्थ्यांना दिला.

लोकमत कॅम्पस क्लब आणि डीएफसी यांच्या वतीने रविवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सध्या १० वी मध्ये शिकणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काबरा यांनी करिअरचा गांभीर्याने विचार करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दिशादर्शक ठरेल, अशा शब्दांत मार्गदर्शन केले.

यावेळी काबरा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण वयाच्या २६-२७ व्या वर्षी होते. त्यामुळे लग्न आणि संसारही उशिरा सुरू होतो. वयाचा एवढा मोठा टप्पा शिक्षणात जात असल्याने डीएफसीने विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही क्षेत्रांसाठी उत्कृष्ट कोर्सेस तयार केले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे कशी गाठता येतील, याचीही त्यांनी माहिती दिली.

ते पुढे म्हणाले की, १० वी नंतर पुढील ५ वर्षांतच यूपीएससी, एमपीएससीची तयारी करून घेणारा महत्त्वपूर्ण कोर्स डीएफसीने सुरू केला आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेत ११ वी व १२ वीला असणारा कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. विशेष म्हणजे या कोर्समध्ये १२ वी नंतर पुढील ३ वर्षे कमवा व शिका अंतर्गत अभ्यास करून घेण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे व पैशाचे महत्त्व समजेल आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकासही होईल.

तसेच सीए, सीएस याशिवाय सीएलएटी म्हणजेच विधि शिक्षण, एमबीएची तयारीही डीएफसी येथे अशाच पद्धतीने करून घेण्यात येईल. आयआयटी, एनईईटी, यूपीएससी, एनडीए, सीए, सीएस, केव्हीपीवाय या सर्वच परीक्षांमध्ये योग्य नियोजनाद्वारे यश कसे मिळविता येईल, हे देखील काबरा यांनी समजावून सांगितले. या सर्व कोर्सेससाठी डीएफसी येथे नवीन बॅच दि. १६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अधिक माहिती आणि प्रवेशपूर्व परीक्षेच्या माहितीसाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क साधून मोफत नाव नोंदणी करावी.

चौकट :

यशाचा मार्ग सोपा करणारा चार्ट व हेल्पलाइन

डीएफसी येथे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेल्फ स्टडी चार्टच्या मदतीने अभ्यास केल्यास अभ्यासाचा ताण न येता स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे जाते, तसेच चार्टद्वारे विद्यार्थ्यांना रेकॉर्ड किपिंग व आवश्यक स्पर्धात्मक कौशल्याच्या ज्या सवयी लागतात, त्या भावी आयुष्यातही उपयुक्त ठरतात. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी डीएफसी येथे विशेष हेल्पलाइन सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

सूचना

डीएफसी व कॅम्पस क्लब यांचा लोगो.

गोविंद काबरा यांचा फोटो.