शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आचारसंहितेमध्ये जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:57 IST

पुरावे दिले तरच संबंधितांना मिळणार रक्कम परत

ठळक मुद्देभरारी पथकाने पकडली होती रोख जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांची रक्कम भरारी पथकाने जप्त केली आहे, ती रक्कम कुठून आणली, त्याचे पुरावे सादर केले तरच ती रक्कम त्यांना परत दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर १० मार्च ते २३ एप्रिलदरम्यान निवडणूक विभागाच्या भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजारांची बेहिशेबी रोकड जप्त केली. तर ग्रामीण भागात ४६ लाखांच्या आसपास रक्कम जप्त केली. संबंधित व्यक्तींनी हिशेब सादर न केल्यास ही रक्कम आयकर विभागाकडे जमा केली जाईल. तसेच त्यासंबंधीचा निर्णयही आयकर विभागच घेईल, अशी माहिती निवडणूक विभाग सूत्रांनी दिली. आचारसंहितेत निवडणुकीसाठी पैशांचा हवाला व्यवहार होऊ नये, यावर नजर ठेवण्यासाठी नाकाबंदीच्या अनुषंगाने चेकपोस्ट होते. तसेच जिल्ह्यात ३७ पथके स्थापन करण्यात आली होती.

दीड महिन्यात शहरातील भरारी पथकांनी ६६ लाख ५५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती. पैशांसह संबंधित वाहनामध्ये उमेदवार, पक्षांचे झेंडे व इतर प्रचार साहित्य आढळल्यास गुन्हा नोंदवून रक्कम जप्त करण्यात येते. आचारसंहितेच्या काळात सुमारे सोळा लाख रुपये किमतीची दारूही जप्त करण्यात आली होती. 

काही प्रकरणांत सीईओकडे झाली सुनावणी निवडणूक विभागाच्या पथकाने जप्त केलेली रक्कम कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती, कुठून आली, याचे पुरावे सादर केल्यानंतरच संबंधित व्यक्तीला परत केली जाणार आहे. यासंबंधी जि. प. सीईओ पवनीत कौर यांच्याकडे काही प्रकरणांत सुनावणी झाली असून, काही प्रकरणांत सुनावणी सुरू आहे. येत्या आठ दिवसांत सर्व प्रकरणांची सुनावणी पूर्ण करून त्याचा निकाल जाहीर केला जाईल. मतमोजणीपूर्वी जप्त रकमेबाबत निर्णय घेण्यात येईल. ज्यांना रकमेचा हिशेब देता येणार नाही, त्यांची रक्कम आयकर विभागाकडे दिली जाईल. त्याबाबत पुढील कार्यवाही आयकर विभागच करील, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMONEYपैसाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग