शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याला बसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:41 IST

खाजगी वाहतूक करणा-या बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकालगत बजाज विहार गेटसमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : खाजगी वाहतूक करणा-या बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकालगत बजाज विहार गेटसमोर घडली. सविता सोन्ने असे मृत महिलेचे नाव आहे. हे दाम्पत्य एका लग्न समारंभासाठी जात होते.समाधान काशीनाथ सोन्ने (३६, रा. बोरगाव जहागीर, भोकरदन, जि. जालना ह.मु. जयभवानी चौक, बजाजनगर) हे पत्नी सविता (३२) व दोन मुलांसह एक-दीड वर्षापासून बजाजनगरात राहत असून, एका खाजगी हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतात. रविवारी सकाळी ९ वाजता पती-पत्नी बजाजनगर येथून दुचाकी (क्रमांक एचएच - २०, डीयू - ६१४९) वर बसून फुलंब्री तालुक्यात एका नातेवाईकाच्या लग्नाला जात होते. पंढरपूर येथील तिरंगा चौकालगत असलेल्या बजाज विहार गेटसमोर रांजणगावकडे जाणा-या खाजगी वाहतूक करणा-या बसने (क्रमांक एचएच - २०, सीटी - ८९९८) अचानक वळण घेऊन सोन्ने यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. अपघातात सविता सोन्ने बसच्या चाकाखाली येऊन गंभीर जखमी झाल्या. समाधान सोन्ने बाजूला फेकले गेल्याने त्यांच्या छाती, हात-पाय व डोक्याला जबर मार लागला. जखमींना १०८ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डॉ. अमोल कोलते व चालक बोडखे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सविता सोन्ने यांना मृत घोषित केले. जखमी समाधानवर उपचार सुरू आहेत. दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा आहे.